घरक्रीडासोलापुरात संतोष ट्रॉफी राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन

सोलापुरात संतोष ट्रॉफी राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन

Subscribe

आठ राज्यांचे संघ ; १६० खेळाडूंचा सहभाग

सोलापूर- ( प्रतिनिधी ) – अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशन यांच्यावतीने सोलापुरात गुरुवारपासून( 7 फेब्रुवारी) संतोष ट्रॉफी राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सोलापुरातील इंदिरा गांधी स्टेडियमवर होणार्‍या या राष्ट्रीय स्पर्धेसाठी एकूण आठ राज्यांच्या संघातील एकूण १६० खेळाडू आणि अन्य सदस्य असे एकूण २०० खेळाडू सहभागी होणार असल्याची माहिती या स्पर्धेचे स्वागताध्यक्ष मनपा आयुक्त डॉ. अविनाश ढाकने यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या संघात सोलापुरच्या ओंकार मस्के याची निवड झाली आहे.

या स्पर्धेचे उद्घाटन बुधवारी सायंकाळी पाच वाजता जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीकांत अणेकर यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी पोलीस आयुक्त महादेव तांबडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड, डॉ. रणजित गांधी, वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे सचिव साऊटर व्हाझ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

- Advertisement -

ग्रुप ‘ए ’ मध्ये गोवा,मध्य प्रदेश, दमण – दिव आणि लक्षद्वीप तर ग्रुप ‘बी’ मध्ये महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात आणि दादर- नगर हवेली या राज्याचे संघ आहेत. ७ फेब्रुवारी रोजी गोवा विरुद्ध दमण – दिव आणि मध्य प्रदेश विरुद्ध लक्षद्वीप यांच्यात सामना होईल. ८ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र विरुद्ध गुजरात आणि राजस्थान विरुद्ध दादर नगर हवेली एकमेकांशी भिडतील. ९ फेब्रुवारी रोजी दमण – दिव विरुद्ध मध्य प्रदेश आणि लक्षद्वीप विरुद्ध गोवा यांच्यात सामने होतील.

१० रोजी गुजरात विरुद्ध महाराष्ट्र आणि दादर नगर हवेली विरुद्ध महाराष्ट्र यांच्यात लढत होईल. ११ तारखेला दमण दिव विरुद्ध लक्षद्वीप आणि गोवा विरुद्ध मध्यप्रदेश यांच्यात सामना रंगणार आहे. १२ रोजी गुजरात विरुद्ध दादर नगर हवेली तसेच महाराष्ट्र विरुद्ध राजस्थान यांच्यात सामना रंगणार आहे. १२ तारखेला अंतिम सामना संपल्यानंतर सायंकाळी ५ वाजता जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. यावेळी पोलीस अधीक्षक मनोज पाटील आणि वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे सचिव साऊटर व्हाझ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -