घरमुंबईवाहन मालकाची फसवणूक करणार्‍याला अटक

वाहन मालकाची फसवणूक करणार्‍याला अटक

Subscribe

ओएलएक्सवर विक्रीसाठी ठेवण्यात आलेली जुनी वाहने खरेदी करण्याचे नाटक करून वाहनासह पळ काढून गाडी मालकाची फसवणूक करणार्‍या एकाला नागपाडा पोलिसांनी अटक केली आहे. आरिफ वकील खान उर्फ फैजल उर्फ इम्रान (१९) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

आरिफ हा घाटकोपर पूर्व पंतनगर या ठिकाणी राहण्यास आहे. नागपाडा पोलीस ठाण्यात काही आठवड्यापूर्वी होंडा सिविक या मोटार मालकाने मोटार चोरी केल्याची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी एकाला घाटकोपरमधून आरीफला अटक केली.

- Advertisement -

आरिफ मोटारसायकल चोरी करून त्या चोरीच्या मोटारसायकलची विक्री ओएलएक्सवर करीत होता. त्यानंतर त्याने ओएलएक्सवर जुनी मोटार विकत घ्यायची आहे, असे सांगून सौदा पूर्ण करून मोटार घेऊन एका ठिकाणी बोलावून मोटार चालवून बघतो असे सांगून मोटार मालकाला पैसे न देता आरिफ मोटारीसह तेथून पळ काढत असे.

आरिफ याच्यावर कांजूरमार्ग पोलीस ठाणे, पवई, या ठिकाणी फसवणूक तसेच दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती वपोनी संतोष बागवे यांनी दिली. आरिफकडून नागपाडा पोलिसांनी चोरीची दुचाकी आणि फसवणूक केलेली होंडा सिविक मोटार हस्तगत केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -