घरक्रीडाश्रीशांतची राहुल द्रविडवर आक्षेपार्ह टीका!

श्रीशांतची राहुल द्रविडवर आक्षेपार्ह टीका!

Subscribe

२०१३ साली स्पॉट फिक्सिंगचे प्रकरण उघड झाल्यानंतर श्रीशांतची राजस्थान रॉयल्स या संघातून हकालपट्टी करण्यात आली होती. त्याला संघातून बाहरे काढण्याचा निर्णय तत्कालीन कर्णधार राहुल द्रविड आणि पॅडी अपटन यांनी घेतला होता. मात्र, य निर्णयावर श्रीशांतने तमाशा करत द्रविडवर आक्षेपार्ह टीका केल्याची माहिती पॅडी यांनी आपल्या पुस्तकात दिली आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविड आणि श्रीशांत यांच्या संदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे. श्रीशांतला संघात खेळू दिले नाही म्हणून श्रीशांतने राहुल द्रवीडला शिवीगाळ केल्याची माहिती भारतीय क्रिकेट संघाचे माजी सहायक प्रशिक्षक पॅडी अपटन यांनी दिली आहे. पॅडी अपटन यांनी आपल्या पुस्तकात यासंदर्भात माहिती दिली आहे. ‘बेअरफूट कोच’ या पुस्तकात अपटन यांनी दावा केला आहे की, एस. श्रीशांतने राहुल द्रविडवर आक्षेपार्ह शब्दांत टीका केली होती.

काय आहे नेमके प्रकरण?

पॅडी अपटन यांनी २०१३ सालच्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणाची माहिती पुस्तकात नमूद केली आहे. या पुस्तकात त्यांनी म्हटले आहे की, ‘२०१३ साली स्पॉट फिक्सिंग प्रकरणी तत्कालीन राजस्थान रॉयल संघाचे खेळाडू श्रीशांत, अंकित चव्हाण आणि अजित चंदेला यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. त्याअगोदर मी आणि संघाचा तत्कालीन कर्णधार राहुल द्रविडने तिघांना संघाबाहेर करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या गोष्टीवर श्रीशांतने तमाशा केला. त्यावेळी श्रीशांतने राहुल द्रविडबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.’

- Advertisement -

श्रीशांतने फेटाळले आरोप

दरम्यान, पॅडी अपटन यांचा दावा श्रीशांतने खोठा ठरवला आहे. त्याने पॅडी यांनी केलेले आरोप फेटाळले आहेत. याशिवाय अपटन हा खोटारडा माणू असल्याचे म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -