दारुच्या नशेत हत्तीला Kiss करणं तरूणाला पडलं चांगलच महागात

दारूच्या नशेत असताना २४ वर्षीय तरूणाने असा काही प्रकार केला की, संपुर्ण सोशल मीडियावर त्यांची चर्चा होताना दिसत आहे.

बालपणापासून आपल्याकडे प्रण्यांवर प्रेम करायला शिकवले जाते. परंतु या प्राण्यांचे लाड करणं, त्यांच्यावर प्रेम करणं यालाही काही मर्यादा असते. प्राण्यांना अति प्रमाणात जीव लावणे हे महागात पडू शकते. असाच एक प्रकार कर्नाटकाच्या कोलार येथे नुकताच घडला. दारूच्या नशेत असताना २४ वर्षीय तरूणाने असा काही प्रकार केला की, संपुर्ण सोशल मीडियावर त्यांचीच चर्चा होताना दिसत आहे.

या तरूणाने दारूच्या नशेत असताना एका मोठ्या हत्तीला फिल्मी स्टाईलने किस करण्याचा प्रयत्न केला. तरूणाने हत्तीला किस केल्याचा परिणाम म्हणजे तरूणाला थेट हॉस्पिटल गाठावे लागले. ही घटना बुधवारी घडली असून बेंगलुरूपासून सुमारे ५० किलोमीटर दूर भागात घडली. या बागाच्या जवळील जंगलातून ६ हत्तीचा कळप कटेरी आणि अरालेरी गावाच्या दिशेने जात होता.

या हत्तींचे फोटो काढण्यासाठी गावातील काही लोकं फोटो घेण्यास गेले होते. काहींनी सेल्फी घेण्याचा ही प्रयत्न केला. वन विभागातील अधिकारी हत्तींना पुन्हा जंगलामध्ये पाठवण्याचा प्रयत्न केला मात्र हत्तींचा कळप तिथून जाण्यास तयार नव्हता. यावेळी. २४ वर्षीय या तरूणाने हत्तीच्या खूप जवळ जाण्याचा प्रयत्न केला. हत्तीच्या जवळ जाण्याआधी त्यानं आपल्या मित्राला एका कन्नड चित्रपटाबद्दल सांगितले होते, ज्यामध्ये एक अभिनेता कशाप्रकारे एका हत्तीला किस करतो. तसा प्रयत्न या तरूणाने केला असावा, असे  एका गावकऱ्यांचे म्हणने आहे.

परंतु, वन विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितलं की, त्यांनी या तरूणाकडे बघितलं तर त्याच्या चेहऱ्यावरून रक्त वाहत होते. तो गंभीर जखमी झालेल्या अवस्थेत असल्याने त्याला नीटसं बोलताही येत नव्हतं. त्याला तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. हत्तींपासून बचाव करण्यासाठी दूर पळत असताना बहुतेक त्याची एका मोठ्या झाडाशी टक्कर झालेली असावी अशी शक्यता सध्या वर्तवली जात आहे.