घरक्रीडामालिका विजयानंतर पाकिस्तानी संघाला मिळणार बिस्कीट आणि लॉलीपॉप

मालिका विजयानंतर पाकिस्तानी संघाला मिळणार बिस्कीट आणि लॉलीपॉप

Subscribe

ऑस्ट्रेलियाविरद्धच्या मालिका विजयानंतर विजयी पाकच्या संघाला बिस्किटाची प्रतिकृती असलेला चषक दिला होता. आता न्युझीलंडविरोधात होणाऱ्या मालिकेसाठीच्या चषकाचे नुकतेच अनावरण करण्यात आले. या मालिकेसाठी जो चषक ठेवला आहे, तोदेखील विनोदी असल्याचे पहायला मिळत आहे.

बऱ्याच कालावधीनंतर पाकिस्तानी क्रिकेटला अच्छे दिन आले आहेत. पाकने नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत विजय मिळवला होता. पाकने सुरुवातीला कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला त्यानंतर टी२० मालिकेतही पाकने कांगारुंना नमवले. सर्फराज अहमदच्या नेतृत्वाखाली हा संघ सध्या मजबूत होत आहे. पाकचा सामना आता न्यूझलंडशी होणार आहे. ऑस्ट्रेलियाविरद्धच्या मालिका विजयानंतर विजयी संघाला जो चषक दिला होता त्या चषकावरुन पाकचा संघ चांगलाच ट्रोल झाला. कारण पाकच्या संघाला बिस्किटाची प्रतिकृती असलेला चषक दिला होता. आता न्युझीलंडविरोधात होणाऱ्या मालिकेसाठीच्या चषकाचे नुकतेच अनावरण करण्यात आले. या मालिकेसाठी जो चषक ठेवला आहे, तोदेखील विनोदी असल्याचे पहायला मिळत आहे. न्युझीलंडविरुद्धच्या मालिकेनंतर विजयी संघाला लॉलीपॉपची प्रतिकृत असलेला चषक देण्यात येणार आहे. मालिकेच्या चषकावरून पाकिस्तान संघावर सोशल मीडियावर विनोद सुरू झाले आहेत.

- Advertisement -

वाचा – #MeToo in BCCI: सौरव गांगुलीने बीसीसीआयला झापले

पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ट्वेंटी-20 मालिकेच्या चषकाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यावरुन मोठ्या प्रमाणात विनोददेखील झाले. आता न्यूझीलंडसोबतच्या मालिकेसाठी ठेवलेला चषकदेखील विनोदाचे कारण बणत आहे.

- Advertisement -


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -