घरक्रीडाIPL 2024 : मुंबई इंडियन्सनंतर 'हैदराबाद'चा मोठा निर्णय; कर्णधार पदाची धुरा पॅट...

IPL 2024 : मुंबई इंडियन्सनंतर ‘हैदराबाद’चा मोठा निर्णय; कर्णधार पदाची धुरा पॅट कमिन्सकडे

Subscribe

मुंबई इंडियन्स संघानंतर सनरायझर्स हैदराबाद संघाच्या फ्रेंचायजीने ही आपल्या संघात मोठा बदल केला आहे. त्यानुसार हैदराबादच्या संघाने कर्णधार बदलत आयपीएलच्या 16 व्या पर्वाची धुरा ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स याच्याकडे सोपवली आहे. त्यामुळे आयपीएलचे सोळावे पर्व सुरू होण्यापूर्वीच सर्व क्रिकेटप्रेमींमध्ये चर्चांना उधाण आलं आहे.

इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) १६ वे पर्व 22 मार्चपासून सुरू होणार असून हे पर्व आयपीएलच्या मागील १५ पर्वांपेक्षा वेगळंच असणार आहे. कारण या पर्वात प्रत्येक संघातील खेळाडूंपासून ते कर्णधारांपर्यंत नवे खेळाडू पाहायला मिळार आहेत. काही दिवसांपूर्वीच आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्याऐवजी यंदाच्या आयपीएलमध्ये हार्दिक पांड्याकडे संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. त्यामुळे सर्वच चाहत्यांमध्ये नाराजी पाहायला मिळली. अशातच मुंबई इंडियन्स संघानंतर सनरायझर्स हैदराबाद संघाच्या फ्रेंचायजीने ही आपल्या संघात मोठा बदल केला आहे. त्यानुसार हैदराबादच्या संघाने कर्णधार बदलत आयपीएलच्या 16 व्या पर्वाची धुरा ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स याच्याकडे सोपवली आहे. त्यामुळे आयपीएलचे सोळावे पर्व सुरू होण्यापूर्वीच सर्व क्रिकेटप्रेमींमध्ये चर्चांना उधाण आलं आहे. (pat cummins will captain of sunrisers hyderabad in ipl 2024 aiden markram)

मुंबई इंडियन्सनंतर आयपीएल सुरु होण्यापूर्वीच सनरायझर्स हैदराबादने संघाचा कर्णधार बदलला आहे. दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एडन मार्करम याच्याकडून हैदराबाद संघाचे कर्णधारपद काढून घेण्यात आले असून ऑस्ट्रेलियाला विश्वचषक जिंकून देणाऱ्या पॅट कमिन्सला हैदराबादने कर्णधार केले आहे.

- Advertisement -

याबाबत ‘पॅट कमिन्स आमचा नवा कर्णधार’ असं ट्वीट करत सोमवारी हैदराबाद संघाने माहिती दिली. आयपीएल 24 आधी झालेल्या मिनी लिलावात हैदराबादने पॅट कमिन्सला 20.50 लाख रुपयांमध्ये आपल्या ताफ्यात दाखल केले. पॅट कमिन्स आयपीएलच्या इतिहासात दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला होता.

एडन मार्करम याच्या नैतृत्वात हैदराबादचा संघ आयपीएल 2023 च्या हंगामात उतरला होता. पण एडन मार्करमच्या नेतृत्वात हैदराबाद संघाची कामगिरी अतिशय खराब राहिली होती. मार्करमच्या नेतृत्वात हैदराबाद संघाला 14 पैकी फक्त 4 सामन्यात विजय मिळवता आला होता. त्यामुळे गुणतालिकात हैदराबादचा संघ दहाव्या स्थानावर राहिला. परिणामी, मागील पर्वात अतिशय खराब कामगिरी केल्याने टीम मॅनेजमेंटने कर्णधार बदलण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. केवळ एकदाच डेव्हिड वॉर्नर संघाचा कर्णधार असताना हैदराबादने जेतेपद जिंकले.

- Advertisement -

दरम्यान पॅट कमिन्स जगातील यशस्वी कर्णधारापैकी एक आहे. कमिन्सच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने वनडे विश्वचषकावर नाव कोरले होते. त्याशिवाय कसोटी अजिंक्यपद स्पर्धाही जिंकली होती. त्यामुळे आता कमिन्सकडे नेतृत्व सोपवत हैदराबादनं आयपीएल 2024 साठी नवी रणनिती आखली आहे.


हेही वाचा – IND VS PAK T20 Tickets : सामन्याच्या तिकिटांची किंमत कोट्यवधीच्या घरात; दर गगनाला भिडले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -