घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

ऐसें माझेनि नामघोषें । नाहींचि करिती विश्वाचीं दुःखें । अवघें जगचि महासुखें । दुमदुमित भरलें ॥
याप्रमाणे माझ्या नामघोषाने विश्वाची दु:खे नाहीशी करतात व सर्व जगच ब्रह्मसुखाने जिकडे तिकडे कोंदून भारतात.
ते पाहांटेवीण पाहावित । अमृतेंवीण जीववित । योगेंवीण दावित । कैवल्य डोळां ॥
ते महात्मे प्राकृत सूर्याकडे पहाटेशिवाय ज्ञारूप दिवसाचा उदय करतात व स्वर्गातील प्राकृत अमृताशिवाय ते जगवतात व अष्टांगयोगाशिवाय मोक्ष डोळ्याला दाखवतात. (अनुभवाला आणून देतात).
परी राया रंका पाड धरूं । नेणती सानेयां थोरां कडसणी करूं । एकसरें आनंदाचें आवारु । होत जगा ॥
परंतु हा राजा आहे, हा रंक आहे, असा योग्यताभेद ते मनात धरत नाहीत, लहान मोठा अशी निवड करत नाहीत व जगाला एकसारखे आनंदाचे कोट होतात.
कहीं एकाधेनि वैकुंठा जावें । तें तिहीं वैकुंठचि केलें आघवें । ऐसें नामघोषगौरवें । धवळलें विश्व ॥
(पूर्वी असे होते की) कधी तरी एखाद्याने वैकुंठाला जावे, ते यांनी सर्व वैकुंठच केले. याप्रमाणे माझ्या नामघोषाच्या महात्म्याने संपूर्ण विश्व प्रकाशित केले.
तेजें सूर्य तैसें सोज्वळ । परि तोहि अस्तवे हें किडाळ । चंद्र संपूर्ण एखादे वेळ । हे सदा पुरते ॥
तेजाने ते महात्मे सूर्यासारखे लखलखित आहेत असे म्हणावे, परंतु सूर्याचा अस्त होतो, हा सूर्यात दोष आहे. (व महात्म्यांच्या ज्ञानोदयाचा कधीच अस्त होत नाही. (यांस चंद्राची उपमा द्यावी तर चंद्र एखादे वेळेसच (फक्त पौर्णिमेलाच) पूर्ण असतो आणि हे महात्मे स्वरूपस्थितीने नेहमीच पूर्ण असतात.
मेघ उदार परी वोसरे । म्हणौनि उपमेसी न पुरे । हे निःशंकपणें सपांखरे । पंचानन ॥
मेघ वृष्टी करण्यात उदार असतो, पण तो वोसरतो म्हणून तो मेघ या (बोधाची सदैव वृष्टी करणार्‍या) महात्म्यांना उपमा देण्यास पुरेसा नाही. हे महात्मे नि:संशयपणे कृपाळू असे सिंह आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -