घरक्रीडाIND vs AUS : पृथ्वी शॉचे अपयश भारताला पडले महागात - गिलख्रिस्ट   

IND vs AUS : पृथ्वी शॉचे अपयश भारताला पडले महागात – गिलख्रिस्ट   

Subscribe

दोन डावांत मिळून अवघ्या चार धावा करणाऱ्या पृथ्वी शॉवर टीका होत आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष होते. भारतीय संघ या मालिकेत ऑस्ट्रेलियाला झुंज देईल अशी अपेक्षा होती. मात्र, पहिल्या डावात आघाडी घेऊनही भारताने पहिली कसोटी गमावली. त्यातच भारताचा दुसरा डाव अवघ्या ३६ धावांत आटोपला. त्यामुळे भारतीय फलंदाजांवर बरीच टीका होत आहे. खासकरून दोन डावांत मिळून अवघ्या चार धावा करणाऱ्या युवा सलामीवीर पृथ्वी शॉवर सर्वाधिक टीका होताना दिसत आहे. शॉला आता बहुधा संघातून वगळण्याची वेळ आली आहे, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक अ‍ॅडम गिलख्रिस्टने व्यक्त केले.

पहिल्या कसोटीच्या दोन्ही डावांमध्ये पृथ्वी शॉ लवकर बाद झाला. त्याच्या अपयशामुळे भारतीय संघ सुरुवातीलाच बॅकफूटवर गेला. मागील वर्षी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आला होता आणि त्यावेळी शॉबद्दल बरीच चर्चा सुरु होती. त्याची फलंदाजी पाहण्यासाठी सर्वच जण उत्सुक होते. त्यामुळे त्याच्या फलंदाजीच्या तंत्रावरही सर्वांचे लक्ष होते. शॉ चेंडू मारताना त्याच्या बॅट आणि पॅडमध्ये मोठे फट असते. ही चिंतेची बाब असून त्याने त्याच्या तंत्रावर अधिक मेहनत घेणे गरजेचे असल्याचे गिलख्रिस्ट म्हणाला.

- Advertisement -

शॉ आक्रमक शैलीत फलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. तो सुरुवातीपासूनच फटके मारण्याचा प्रयत्न करतो, पण ही गोष्ट त्याला ऑस्ट्रेलियात घातक ठरू शकते. चेंडू त्याच्या बॅटची कड घेऊन स्लिप किंवा गलीमध्ये जाऊ शकतो. शॉ हा प्रतिभावान युवा फलंदाज आहे. मात्र, त्याने पहिल्या कसोटीत निराशाजनक खेळ केला. त्यामुळे बॉक्सिंग-डे कसोटीसाठी बहुधा निवडकर्ते त्याला वगळण्याचा विचार करत असतील, असेही गिलख्रिस्टने सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -