घरक्रीडाPro Kabaddi League : बंगळुरूमध्ये २२ डिसेंबरपासून सुरू होणार आठवा हंगाम; प्रेक्षकांविना...

Pro Kabaddi League : बंगळुरूमध्ये २२ डिसेंबरपासून सुरू होणार आठवा हंगाम; प्रेक्षकांविना होणार सामने

Subscribe

प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामाला २२ डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे

प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामाला २२ डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. मात्र या हंगामात प्रेक्षकांना परवानगी दिली जाणार नाही. आयोजक मशाक स्पोर्ट्सने पहिले चार दिवस ३-३ सामने घेण्याचा निर्णय घेतला आहे. पीकेएलच्या आठव्या हंगामातील पहिला सामना यु मुम्बा आणि बंगळुरू बुल्स यांच्यामध्ये होणार आहे. त्यानंतर तेलगु टायटन्स आणि तमिल थलाइवाज यांच्यामध्ये सामना होईल. तर पहिल्याच दिवसातील तिसरा सामना यूपी योध्दा आणि गतविजेत्या बंगाल वॉरियर्समध्ये होणार आहे. कोरोनाच्या महासाथीच्या पार्श्वभूमीवर मद्देंजर बंगळुरू व्हाइटफिल्ड हॉटेलला सुरक्षेच्या कारणास्तव बायो-बबलचे स्वरूप देण्यात आले आहे.

दरम्यान, कोरोनाच्या ओमिक्रोन व्हेरियंटचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रेक्षकांना परवानगी नाकारली आहे. त्यामुळे प्रो कबड्डीच्या हंगामातील सर्व १२ संघाना बायो-बबलच्या वातावरणात ठेवले जाणार आहेत. प्रो कबड्डी लीगच्या कार्यक्रमाचे आयोजन झाल्यानंतर कबड्डी लीगचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुपन गोस्वामी यांनी म्हंटले की,”प्रो कबड्डी लीग भारताच्या आपल्या खेळाला पुन्हा एकदा लोकप्रिय आणि जिवंत करण्यासाठी प्रयत्न करेल. आमचा हेतू या खेळाला पुन्हा एकदा नवीन उंची देण्यासोबतच कबड्डी प्रेमींना मनोरंजन देण्याचा आहे”.

- Advertisement -

अनुपम गोस्वामी यांनी आणखी म्हंटले की, “यावेळी दोन भागांमध्ये वेळापत्रक जाहीर केल्याने संघांना अधिक चांगली रणनीती बनवण्यास मदत होईल. यामुळे आम्ही या खेळाच्या चाहत्यांशी अधिक काळ जोडले जाऊ. ट्रिपल हेडर आणि ट्रिपल पंगा चाहत्यांना त्यांचे आवडते खेळाडू आणि संघ पाहण्याची जास्तीत जास्त संधी देईल कारण हे सर्व संघ विजेतेपद जिंकण्यासाठी खूप मेहनत घेत असतात”.


हे ही वाचा: http://IND vs SA : ओमिक्रॉन व्हेरिएंटने वाढवले BCCI चे टेंन्शन; भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा होणार?

- Advertisement -

 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -