घरमनोरंजन५८ वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता 'ओमिक्रॉन व्हेरियंट' नावाचा सिनेमा? राम गोपाल वर्मा...

५८ वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता ‘ओमिक्रॉन व्हेरियंट’ नावाचा सिनेमा? राम गोपाल वर्मा यांनी शेअर केले पोस्टर

Subscribe

कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटने जगभरात दहशत निर्माण केली आहे. सोशल मीडियावरही ओमिक्रॉन व्हेरियंटसंदर्भात अनेक तऱ्हेच्या बातम्या, व्हिडिओ, माहिती शेअर होतेय. अशातच बॉलिवूड चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा यांनीही ‘ओमिक्रॉन व्हेरियंट’ संदर्भात एक पोस्टर शेअर केलेय. जे पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ५८ वर्षापूर्वी ‘ओमिक्रॉन व्हेरियंट’ नावाचा एक सिनेमा प्रदर्शित झाला होता असा दावा या पोस्टरमधून करण्यात आला आहे.  या पोस्टरसोबत त्यांनी कॅप्शन देखील तितकीच भयानक दिली आहे. १९९३ साली ओमिक्रॉन व्हेरियंट नावाचा सिनेमा प्रदर्शित झाला होता. त्यामुळे हा सिनेमा आत्ता अधिकच चर्चेचा विषय ठरतोय. अनेक लोकांनी आत्तापर्यंत हे पोस्टर शेअर केले आहे. परंतु पोस्टरमध्ये जे दिसतयं ते सत्य नाही. जाणून घ्या यामागची नेमकी गोष्ट काय आहे.

- Advertisement -

चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा आपल्या ट्वीटमुळे नेहमी चर्चेत असतात. यात पुन्हा एकदा नव्या ट्वीटमुळे ते चर्चेत आलेत. जगभरात पसरणाऱ्या ओमिक्रॉन व्हेरियंटसंदर्भात राम गोपाल वर्मा यांनी एक पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरसह त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, “माझ्यावर विश्वास ठेवा किंवा बेशुद्ध पडा. हा सिनेमा १९६३ साली आला होता. जरा टॅग लाईन चेक करा.”

पोस्टरची टॅग लाईन देखील एकदम भयानक

या सिनेमाच्या पोस्टरच्या टॅग लाईनमध्ये लिहिण्यात आले की, जेव्हा पृथ्वी कब्रस्तान बनली होती. ‘द ओमिक्रॉन व्हेरियंट’. राम गोपाल वर्माने शेअर केलेल्या या पोस्टवर आत्ता अनेकांना कमेंट्स केल्या आहेत. एका युजर्सने कमेंट्समध्ये लिहिले की, “व्हॉट्सअर युनिर्व्हसिटीमधून पसरणाऱ्या मेसेजवर विश्वास ठेवणे बंद करा.” तर दुसऱ्या एका युजर्सने लिहिले की, “१९७० च्या दशकात आलेल्या सायन्स फिक्शन सिनेमाच्या पोस्टरवर फोटोशॉप करत द ओमिक्रॉन व्हेरियंट लिहिले आहे.” त्यामुळे युजर्सकडून आत्ता राम गोपाल वर्माच्या पोस्टरला फेक सांगितले जात आहे.

- Advertisement -

 

का आहे IMDb ?

जर तुम्ही IMDb वर चेक केलात तर तुम्हाला ‘ओमिक्रॉन व्हेरियंट’ नाही तर केवळ ‘ओमिक्रॉन’ नावाचा एक सिनेमा दिसेल. हा एक कॉमेडी-सायन्स फिक्शन सिनेमा आहे. यात एक एलियन मानवी रुपात पृथ्वीवर अनेक गोष्टी शिकण्यासाठी येतो, यातून एलियनची प्रजाती पृथ्वीवर वाढवण्याचा हेतू असतो. यात २०१३ मध्ये अशाच नावाचा एक सिनेमा आला होता. ज्याचे नाव ‘The Visiter From Planet Omicron’ असे होते. ओमिक्रॉन हे ग्रीक अल्फाबेट आहे. ज्याचा उपयोग यापूर्वी देखील अनेक ठिकाणी करण्यात आला होता.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -