घरक्रीडाWorld Tour Finals : सिंधू, श्रीकांतचा सलग दुसऱ्या सामन्यात पराभव

World Tour Finals : सिंधू, श्रीकांतचा सलग दुसऱ्या सामन्यात पराभव

Subscribe

सलग दोन साखळी सामने गमावल्याने श्रीकांत आणि सिंधू या दोघांनाही बाद फेरी गाठणे अवघड जाऊ शकेल. 

भारताचे आघाडीचे बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि किदाम्बी श्रीकांत यांना बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर फायनल्स स्पर्धेत सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. महिला एकेरीच्या दुसऱ्या साखळी सामन्यात सिंधूवर थायलंडच्या रॅटचनॉक इंटानोनने १८-२१, १३-२१ अशी मात केली. सिंधूने पहिल्या गेमच्या सुरुवातीला चांगला खेळ केला. तिच्याकडे १७-७ आणि त्यानंतर १४-१० अशी आघाडी होती. परंतु, इंटानोनने दमदार पुनरागमन करत हा गेम २१-१८ असा जिंकला. दुसऱ्या गेममध्ये मात्र सिंधूला चांगला खेळ करता आला नाही. तिने हा गेम १३-२१ असा मोठ्या फरकाने गमावला. त्याआधी पहिल्या साखळी सामन्यात सिंधूला जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असणाऱ्या ताय झू यिंगने पराभूत केले होते.

- Advertisement -

वेची श्रीकांतवर मात

दुसरीकडे पुरुष एकेरीत श्रीकांतला तैवानच्या वांग झू वेने २१-१९, ९-२१, १९-२१ असे पराभूत केले. श्रीकांतने या सामन्याची अप्रतिम सुरुवात करताना पहिला गेम २१-१९ असा जिंकला. दुसऱ्या गेममध्ये मात्र त्याचा खेळ खालावला आणि याचा फायदा घेत वेने हा गेम २१-९ असा मोठ्या फरकाने जिंकला. तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये श्रीकांतने झुंजार खेळ केला. मात्र, तो विजय मिळवण्यासाठी पुरेसा नव्हता. वेने हा गेम २१-१९ असा जिंकला. सलग दोन साखळी सामने गमावल्याने श्रीकांत आणि सिंधू या दोघांनाही बाद फेरी गाठणे अवघड जाऊ शकेल.

- Advertisement -

हेही वाचा – सौरव गांगुलीवर पुन्हा अ‍ॅन्जिओप्लास्टी


 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -