घरक्रीडाRanji Trophy Final : मुंबईकडे 8 वर्षांनंतर रणजी ट्रॉफी; 42व्यांदा पटकावला विजेतेपदाचा...

Ranji Trophy Final : मुंबईकडे 8 वर्षांनंतर रणजी ट्रॉफी; 42व्यांदा पटकावला विजेतेपदाचा मान

Subscribe

मुंबई : मुंबईने चमकदार कामगिरी करत 8 वर्षांनंतर पुन्हा एकदा रणजी ट्रॉफीवर आपले नाव कोरले. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर 2023-24 रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात मुंबईने विदर्भाचा 169 धावांनी पराभव केला. मुंबईकडून मिळालेल्या 538 धावांचा पाठलाग करताना विदर्भाने दुसऱ्या डावात केवळ 418 धावांच करता आल्या. त्यामुळे विदर्भाचे तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावण्याचे स्वप्न भंगले. विशेष म्हणजे मुंबईने 42 व्यांदा रणजी ट्रॉफी जेतेपद पटकावले. (Ranji Trophy Final Mumbai won the Ranji Trophy for the 42nd time after 8 years)

हेही वाचा – Supreme Court : शरद पवारांचे फोटो वापरणे थांबवा, अजित पवार गटाला सुप्रीम कोर्टाने फटकारले

- Advertisement -

मुंबईकडून दुसऱ्या डावात मिळालेल्या 538 धावांचा पाठलाग करताना विदर्भाने 133 धावांवर 4 विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर करुण नायर आणि कर्णधार अक्षय वाडकर यांनी पाचव्या विकेटसाठी 95 धावांची भागीदारी केली. परंतु मुशीर खानने नायरला बाद करून ही भागीदारी संपुष्टात आणली. करुण नायर बाद झाल्यानंतर अक्षय वाडकर आणि हर्ष दुबे यांनी सहाव्या विकेटसाठी 130 धावांची भागीदारी करत विदर्भाला पुन्हा एकदा सामन्यात आणले. त्यानंतर पाचव्या आणि शेवटच्या दिवशी या दोघांनी पहिल्या सत्रात एकही विकेट पडू दिली नाही. मात्र, दुसऱ्या सत्रात मुंबईच्या गोलंदाजांनी पुनरागमन करत विदर्भाचा दुसरा डाव 368 धावांत गुंडाळला. अक्षय वाडकरने विदर्भाकडून सर्वाधिक 102 धावांची खेळी केली, तर हर्ष दुबेने 65 धावांचे योगदान दिले. मुंबईकडून तनुष कोटियनने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या, तर मुशीर खानला 2 विकेट मिळाल्या.

- Advertisement -

तत्पूर्वी मुंबईचा दुसरा डाव 418 धावांवर आटोपला. पहिल्या डावाच्या जोरावर मुंबईकडे 119 धावांची मोठी आघाडी असल्याने विदर्भाला 538 धावांचे लक्ष्य मिळाले. मुंबईसाठी दुसऱ्या डावात मुशीर खानने सर्वाधिक 136 धावांची खेळी केली. त्याने 326 चेंडूंचा सामना करताना 10 चौकार मारले. तर मुंबईकडून श्रेयस अय्यर (95), कर्णधार अजिंक्य रहाणे (73) आणि शम्स मुलानी (50) यांनीही अर्धशतकी खेळी खेळली. विदर्भाकडून हर्ष दुबेने सर्वाधिक 5 विकेट घेतल्या, तर यश ठाकूरला 3 विकेट मिळाल्या.

दरम्यान, रणजी ट्रॉफीबद्दल बोलायचे झाले तर मुंबई संघ विक्रमी 48 व्यांदा रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात खेळत होता. तर विदर्भ तिसऱ्यांदा अंतिम फेरीत होता. उपांत्य फेरीच्या सामन्यात मुंबईने तामिळनाडूचा एक डाव आणि 70 धावांनी पराभव करत अंतिम सामन्यात प्रवेश केला, तर विदर्भाने मध्य प्रदेशचा 62 धावांनी पराभव करून अंतिम सामन्याचे तिकीट मिळवले होते.

हेही वाचा – One Nation-One Election : पहिल्या टप्प्यात लोकसभा, विधानसभा निवडणुका एकत्र; असे काम करेल वन नेशन, वन इलेक्शन

मुंबई आकडेवारीत चॅम्पियन

  1. 42व्यांदा मुंबई/बॉम्बेने रणजी ट्रॉफी जिंकली
  2. मुंबईने 10व्यांदा, तर बॉम्बे या नावाने 32व्यांदा विजय मिळवला
  3. रणजी ट्रॉफी जिंकणारा अजिंक्य रहाणे हा मुंबई/बॉम्बेचा 26वा कर्णधार ठरला
  4. पहिला विजेता कर्णधार एल.पी.जय (मार्च 1935)
  5. अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली सर्वाधिक 4 वेळा विजेतेपद पटकावले
  6. घरच्या मैदानावर 26वे विजेतेपद (बॉम्बे जिमखाना येथे 1 वेळा, ब्रेबॉर्न स्टेडियमवर 14वेळा आणि आता वानखेडे स्टेडियमवर 11वेळा)
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -