घरक्रीडानेमबाजी विश्वचषक स्पर्धा

नेमबाजी विश्वचषक स्पर्धा

Subscribe

भारताने आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषकाच्या तिसर्‍या दिवशी पदकांची खाते उघडलेच. भारताच्या नेमबाजांना १० मीटर एअर रायफल मिश्र सांघिक आणि १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक या प्रकारामध्ये सुवर्णपदके मिळवली. युवा नेमबाज मनू भाकर आणि सौरभ चौधरी यांच्या जोडीने १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेचे सुवर्णपदक पटकावले. त्याआधी अंजुम मुद्गिल आणि दिव्यांश सिंह पन्वर या जोडीने १० मीटर एअर रायफल मिश्र सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक आपल्या नावे केले होते.

मनू भाकर आणि सौरभ चौधरी या जोडीने १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात यजमान चीनची जोडी जियांग रँकसिन आणि पॅन्ग वे यांचा १६-६ असा पराभव केला. भारतीय जोडीने पात्रता फेरीत ४८२ गुण मिळवत स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. याच स्पर्धेत हिना सिद्धू आणि रिझवी शाहझार या जोडीला अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले. तर मनू आणि सौरभ या जोडीचे विश्वचषकातील १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिकमधील दुसरे सुवर्णपदक होते. याआधी त्यांनी फेब्रुवारीत नवी दिल्ली येथे झालेल्या विश्वचषकात सुवर्ण मिळवले होते.

- Advertisement -

त्याआधी अंजुम मुद्गिल आणि दिव्यांश सिंह पन्वर या जोडीने १० मीटर एअर रायफल मिश्र सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. त्यांनी या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात चीनच्या लिऊ रुकझान आणि यांग हाओरान या जोडीवर १७-१५ अशी मात केली. या अंतिम सामन्यात भारताची जोडी ११-१३ अशी पिछाडीवर होती. मात्र, त्यांनी मोक्याच्या क्षणी आपला खेळ उंचावत हा सामना जिंकला. त्याआधी त्यांनी या स्पर्धेच्या पात्रता फेरीत ५२२.७ गुण मिळवले होते. याच स्पर्धेच्या अंतिम फेरीत अपूर्वी चंदेला आणि दीपक कुमार यांना सहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -