घरक्रीडाIND vs AUS : सौरव गांगुलीला आला टीम इंडियाच्या मदतीला धावून! 

IND vs AUS : सौरव गांगुलीला आला टीम इंडियाच्या मदतीला धावून! 

Subscribe

भारताने दुसऱ्या डावात ज्याप्रकारे फलंदाजी केली, ते गांगुलीला फारसे आवडले नाही. 

भारतीय संघाची ऑस्ट्रेलियातील कामगिरी सुधारण्यासाठी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह प्रयत्नशील असून या दोघांनीही काही योजना आखल्या आहेत, अशी माहिती राजीव शुक्ला यांनी दिली. राजीव शुक्ला यांची लवकरच बीसीसीआयच्या उपाध्यक्षपदी निवड होणे अपेक्षित आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धची पहिलीच कसोटी भारताने गमावली. तिसऱ्या दिवशी भारताचा दुसरा डाव ३६ धावांत आटोपला आणि त्यामुळे ऑस्ट्रेलियाला सामना जिंकण्यासाठी ९० धावांचे आव्हान मिळाले. त्यांनी हे आव्हान ८ विकेट राखून गाठत सामना जिंकला आणि चार सामन्यांच्या या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. भारताने दुसऱ्या डावात ज्याप्रकारे फलंदाजी केली, ते गांगुलीला फारसे आवडले नाही.

भारतीय संघ खूपच कमी धावसंख्येत गारद झाला आणि हे आम्हाला अजिबातच आवडले नाही. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांना चिंता वाटत आहे. भारतीय संघाची कामगिरी सुधारण्यासाठी या दोघांनीही काही योजना आखल्या असून ते लवकरच संघ व्यवस्थापनाशी चर्चा करणार आहेत. भारतीय संघ पुढील कसोटीत चांगला खेळ करतील अशी मला आशा असल्याचे शुक्ला यांनी सांगितले. भारतीय संघाने पहिल्या डावात चांगली फलंदाजी केली आणि आघाडीही घेतली. मात्र, दुसऱ्या डावात आपला डाव गडगडला. आपल्या खेळाडूंमध्ये क्षमतेची कमी नाही. ते मेलबर्न कसोटीत त्यांचा खेळ सुधारतील अशी आशा असल्याचेही शुक्ला म्हणाले.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -