घरक्रीडाखेलरत्न पुरस्कार घ्यायला निघाला अन् आईच्या निधनाची बातमी समजली; अर्ध्यातूनच माघारी परतला...

खेलरत्न पुरस्कार घ्यायला निघाला अन् आईच्या निधनाची बातमी समजली; अर्ध्यातूनच माघारी परतला कृष्णा

Subscribe

कृष्णाच्या आईने त्याला पुरस्कार मिळण्याच्या काही तासांपूर्वीच त्याचा आणि जगाला कायमचा निरोप घेतला

आपल्या मुलाला कोणतातरी मोठा पुरस्कार मिळावा हे प्रत्येक आईचे स्वप्न असते. मात्र बॅडमिंटनचा खेळाडू कृष्णा नागरच्या बाबतीत काही वेगळेच झाले. कृष्णाच्या आईने त्याला पुरस्कार मिळण्याच्या काही तासांपूर्वीच त्याचा आणि जगाला कायमचा निरोप घेतला. कृष्णाची आई इंद्रा नागर यांचे शनिवारी दुपारी निधन झाले. आईच्या निधनाची बातमी समजताच खेलरत्न पुरस्कार स्विकारण्यासाठी गेलेला कृष्णा राष्ट्रपती भवनात पोहचण्याअगोदरच जयपुरकडे माघारी परतला. यावेळी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार समितीने देशभरातील १२ खेळाडूंची मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारांसाठी निवड केली होती. या पुरस्कारांच्या यादीत राजस्थानच्या अवनी लेखरा आणि कृष्णा नागर या दोन पॅरालिम्पिक खेळाडूंचा देखील समावेश होता.

कृष्णा नागरची आई इंद्रा नागर या पाच दिवसांपूर्वीच छतावरून पडल्या होत्या. त्याच्यानंतर त्यांना जयपूरच्या एका खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते तिथे त्यांच्यावर उपचार चालू होते. मात्र शनिवारी दुपारी त्यांची तब्येत अचानक बिघडली आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शनिवारी संध्याकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद खेळांडूना खेलरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करणार होते. पुरस्कराचा सन्मान स्विकारण्यापूर्वीच कृष्णा जयपूरला परतला. त्याने २०२० पॅरालिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकले होते.

- Advertisement -

राष्ट्रपतींच्या हस्ते खेलरत्न स्विकारल्यानंतर टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्ण पदक विजेत्या प्रमोद भगतने सांगितले की, “मला कृष्णाच्या काकांचा शुक्रवारी रात्री १२ वाजता फोन आला होता. पण मी आणि माझ्या साथीदारांनी या बाबतीत कृष्णाला काही माहिती दिली नाही. कृष्णाला फक्त त्याच्या आईची तब्येत खूप खराब असल्याची माहिती दिली.

प्रमोदने सांगितलेल्या माहितीनुसार कृष्णाची आई तीन दिवसांपूर्वी अचानक छतावरून खाली पडली होती. त्यांच्या डोक्याला दुखापत झाली होती. कृष्णा पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमात येण्यास तयार नव्हता पण वडिलांच्या आग्रहामुळे तो पुरस्कार स्विकारण्यासाठी आला होता. त्याला देशातील सर्वोच्च पुरस्कार मिळणार याचा आनंद होता पण हा आनंद त्याला त्याच्या आईसोबत साजरा करायचा होता. पण तो एकटाच पुरस्कार स्विकारायला गेला आणि दुख:द बातमीमुळे माघारी परतला.

- Advertisement -

हे ही वाचा: T20 WC Final : AUS vs NZ नव्या चॅम्पियनसाठी आज चुरशीची लढत; अशी असू शकते दोन्ही संघातील प्लेइंग XI


 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -