घरक्रीडाT20 WC Final : AUS vs NZ नव्या चॅम्पियनसाठी आज चुरशीची लढत;...

T20 WC Final : AUS vs NZ नव्या चॅम्पियनसाठी आज चुरशीची लढत; अशी असू शकते दोन्ही संघातील प्लेइंग XI

Subscribe

आज होणाऱ्या दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर दोन्हीही संघातील खेळांडूवर सगळ्यांचीच नजर असणार आहे

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दोन्हीही संघ आपला पहिला टी-२० विश्वचषचक जिंकण्याच्या तयारीत आहेत. जगातील दोन्हीही सर्वोत्कृष्ठ संघाना एकदाही टी-२० विश्वचषकाचा किताब जिंकण्यात यश आले नाही. अशातच दोन्हीही संघाकडे आपला पहिला किताब जिंकण्याची मोठी संधी असणार आहे. उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा पराभव केला तर न्यूझीलंडने शेवटच्या षटकांत शानदार खेळी करून इंगलंडचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश निश्चित केला. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दोन्हीही संघाकडे आक्रमक गोलंदाजीची क्षमता आहे. अशातच रविवारी म्हणजेच आज होणाऱ्या दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावरील अंतिम सामन्यात दोन्हीही संघातील खेळांडूवर सगळ्यांचीच नजर असणार आहे.

स्टोइनिस विरूध्द नीशम

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दोन्हीही संघाना अंतिम फेरीत पोहचवण्यात संघातील अष्टपैलू खेळांडूची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. ऑस्ट्रेलियाकडून मार्कस स्टोइनिस तर न्यूझीलंडकडून जेम्स नीशम यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. तसेच आता दोन्हीही संघाना अंतिम सामन्यात या खेळांडूकडून चांगल्या खेळीची अपेक्षा असणार आहे.

- Advertisement -

वॉर्नर आणि विलियमसनच्या खेळीकडे सर्वांचे लक्ष

ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज डेविड वॉर्नर सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने सध्या चालू विश्वचषकात चांगली खेळी करून संघाला फायनलमध्ये पोहचवण्यात मोठा हातभार लावला आहे. तर विश्वचषकाच्यापूर्वी वॉर्नच्या खेळीवर विविध स्तरांतून प्रश्न उपस्थित केले जात होते अशातच वॉर्नरने त्याच्या शानदार खेळीने सर्वांनाच उत्तर दिले आहे. तर न्यूझीलंडकडून कर्णधार केन विलियमसनवर पुन्हा एकदा एक मोठी जबाबदारी असणार आहे. विलियमसनने कित्येकवेळा कठिण परिस्थितीतून संघाला सावरले आहे. त्याची शानदार खेळी न्यूझीलंडला विश्वचषक जिंकून देण्यात महत्त्वाची असेल.

ऑस्ट्रेलियाचा आजचा संभावीत संघ

डेविड वॉर्नर, अॅरोन फिंच (कर्णधार), मिचेल मार्श, स्टीव स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोइनिस, मॅथ्यू वेड, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा, जोश हेजलवुड,

- Advertisement -

न्यूझीलंडचा आजचा संभावीत संघ

मार्टिन गुप्टील, डेरिल मिचेल, केन विलियमन (कर्णधार), टिम सीफर्ट, ग्लेन फिलिप्स, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, टिम साउदी, एडम मिलने, ट्रेन्ट बोल्ट, इश सोधी,

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -