घरक्रीडायशस्वी जैस्वालची देवधर करंडकासाठी निवड

यशस्वी जैस्वालची देवधर करंडकासाठी निवड

Subscribe

हनुमा विहारी, पार्थिव पटेल, शुभमन गिल कर्णधारपदी

मुंबईचा युवा फलंदाज यशस्वी जैस्वालची देवधर करंडक स्पर्धेसाठी भारत ब संघात निवड झाली आहे. भारत अ, भारत ब आणि भारत क या तीन संघांमध्ये होणारी ही ५०-५० षटकांची स्पर्धा ३१ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर या कालावधीत रांची येथे पार पडणार आहे. भारत अ संघाच्या कर्णधारपदी हनुमा विहारी, ब संघाच्या कर्णधारपदी पार्थिव पटेल, तर क संघाच्या कर्णधारपदी शुभमन गिलची निवड झाली आहे.

मुंबईकडून खेळणार्‍या सलामीवीर यशस्वी जैस्वालने यंदाच्या विजय हजारे करंडकात उत्कृष्ट कामगिरी केली. त्याने या स्पर्धेच्या ६ सामन्यांत ११२.८० च्या सरासरीने आणि १०४ च्या स्ट्राईक रेटने ५६४ धावा चोपून काढल्या. यात तीन शतके आणि एका अर्धशतकाचा समावेश होता. त्याने झारखंडविरुद्धच्या सामन्यात २०३ धावांची खेळीही केली होती. त्यामुळे त्याची देवधर करंडकासाठी निवड करण्यात आली आहे. तसेच केदार जाधवचा ब संघात, तर मयांक अगरवालचा क संघात समावेश करण्यात आला आहे.

- Advertisement -

संघ –

भारत अ : हनुमा विहारी (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, अभिमन्यू इश्वरन, विष्णु विनोद, अमनदीप खरे, अभिषेक रमन, ईशान किशन (यष्टीरक्षक), शाहबाझ अहमद, रवी बिश्नोई, रविचंद्रन आश्विन, जयदेव उनाडकट, संदीप वॉरियर, सिद्धार्थ कौल, भार्गव मेराई.

भारत ब : पार्थिव पटेल (कर्णधार/यष्टीरक्षक), प्रियांक पांचाळ, यशस्वी जैस्वाल, बाबा अपराजित, केदार जाधव, ऋतुराज गायकवाड, शाहबाझ नदीम, अनुकूल रॉय, कृष्णप्पा गौथम, विजय शंकर, मोहम्मद सिराज, रुश कलारिया, यारा पृथ्वीराज, नितीश राणा.

- Advertisement -

भारत क : शुभमन गिल (कर्णधार), मयांक अगरवाल, अनमोलप्रीत सिंग, सूर्यकुमार यादव, प्रियम गर्ग, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, मयांक मार्कंडे, जलज सक्सेना, आवेश खान, धवल कुलकर्णी, इशान पोरेल, पठानिया, विराट सिंह.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -