घरक्रीडाT20 World Cup 2021 : हार्दिकच्या गोलंदाजीवर कोहलीचं मोठं वक्तव्य, म्हणाला...

T20 World Cup 2021 : हार्दिकच्या गोलंदाजीवर कोहलीचं मोठं वक्तव्य, म्हणाला…

Subscribe

भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने गेले काही सामने नियमितपणे गोलंदाजी केलेली नाही. हार्दिक तंदुरुस्तीमुळे गोलंदाजी करत नसला तरी तो फलंदाज म्हणून आपली भूमिका बजावत आहे. मात्र, टी-२० विश्वचषक स्पर्धेत तो फलंदाज म्हणून संघासाठी तितकाच उपयुक्त आहे का, हा प्रश्नही निर्माण होऊ लागला आहे. यावर भारतीय कर्णधार विराट कोहलीने आपले मत स्पष्ट केले आहे. रविवारी पाकिस्तानविरुद्धच्या महत्त्वपूर्ण सामन्याआधी कोहलीने हार्दिकच्या संदर्भात संघाची काय योजना आहे ते सांगितले.

रोहित शर्माने विश्वचषकातील मुख्य सामने सुरू होईपर्यंत हार्दिक गोलंदाजीसाठी फिट होईल, असे रोहित शर्माने म्हटले होते. पण तसे झाले नाही तर त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळेल का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यावर विराट कोहलीने स्पष् मत मांडले आहे. हार्दिक हा संघाचा महत्त्वाचा खेळाडू आहे. आम्हाला माहित आहे की हार्दिक सध्या गोलंदाजी करत नाही पण त्याच्या फिटनेसमध्ये सुधारणा होत आहे. आम्हाला आशा आहे की स्पर्धेत काही सामन्यांनंतर संघासाठी दोन षटके गोलंदाजी करू शकेल, असे विराट म्हणाला.

- Advertisement -

आम्हाला माहित आहे की पांड्या गोलंदाजी करत नाही तोपर्यंत संघात जे गोलंदाज आहेत, त्यांचा वापर करावा लागेल. आम्ही एक किंवा दोन षटकांसाठी इतर काही पर्यायांवर चर्चा केली आहे. त्यामुळे आम्हाला त्याची फारशी चिंता नाही, असे कोहलीने सांगितले. हार्दिक एक फलंदाज म्हणूनही संघासाठी खूप उपयुक्त आहे. हार्दिक सहाव्या क्रमांकावर ज्या पद्धतीने खेळतो, तसे तुम्ही एकाच रात्रीत शिकू शकत नाहीत. म्हणूनच मी नेहमीच त्याला फलंदाज म्हणून पाठिंबा दिला आहे, असे देखील कोहली म्हणाला.

मी नेहमीच हार्दिकला पाठीशी घातले आहे. तो एक उत्कृष्ट खेळाडू आहे. आम्ही त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत विशेष फलंदाज म्हणून संघात घेतले आणि त्याने उत्तम कामगिरी केली. आम्हाला माहित आहे की जेव्हा तो त्याच्या फॉर्ममध्ये असतो तेव्हा तो संघाला विजय मिळवून देऊ शकतो. त्याची क्षमता काय आहे हे आम्हाला माहित आहे, असे कोहली म्हणाला.

- Advertisement -

विराट म्हणाला, सहाव्या क्रमांकावर खेळणाऱ्या हार्दिकची गुणवत्ता माहित आहे. जगभरातील क्रिकेटवर नजर टाकली, तर या क्रमांकावर खेळणारे स्पेशालिस्ट खेळाडू असतील, तर या ठिकाणी हार्दिकचे स्थान खूप महत्त्वाचे आहे. जेव्हा संघाला धावांची गरज असते आणि त्याचवेळी तो मोठी इनिंग खेळू शकतो. त्यामुळे आम्हाला त्याची भूमिका माहित आहे, असे कोहलीने सांगितले.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -