घरक्रीडाटी-२० वर्ल्डकप ठरल्याप्रमाणेच होणार; आयसीसीचं स्पष्टीकरण

टी-२० वर्ल्डकप ठरल्याप्रमाणेच होणार; आयसीसीचं स्पष्टीकरण

Subscribe

यावर्षी पुरुषांची टी-२० विश्वचषक स्पर्धा १८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहे.

करोनाचा फटका सर्वच क्षेत्राला बसला आहे. करोना संसर्ग रोखण्यासाठी विविध देशांमध्ये निर्बंध लादण्यात आले
आहेत. करोनाचा फटका खेळांनाही बसला आहे. अनेक स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत तसेच पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मात्र, असे असतानाही टी-२० विश्वचषक २०२० स्पर्धा ठरल्याप्रमाणेच होणार आहे, असे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) मंगळवारी सांगितले. यावर्षी पुरुषांची टी-२० विश्वचषक स्पर्धा १८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर आयसीसी टी-२० विश्वचषक २०२० स्पर्धेची स्थानिक आयोजन समिती परिस्थितीचा आढावा घेऊन प्रशासनासोबत काम करत आहे आणि पुढेही करत राहील. आयसीसी टी-२० विश्वचषक २०२० स्पर्धा १८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत ऑस्ट्रेलियातील सात ठिकाणांवर होणार आहे. ही स्पर्धा वेळापत्रकानुसारच घेण्याचा आमचा विचार आहे, असे आयसीसीने आपल्या पत्रकात लिहिले.

- Advertisement -

हेही वाचा – मुंबई आणि पिंपरी चिंचवड येथे प्रत्येकी १ नवा रुग्ण

करोनाचा खेळांनाही फटका बसला असून क्रिकेट याला अपवाद नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि क्रिकेट दक्षिण आफ्रिका (सीएसए) यांनी मिळून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच बीसीसीआयने आयपीएल स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली. बीसीसीआयचे मुंबईच्या वानखेडे स्टेडियम येथील मुख्यालयही बंद करण्यात आले आहे, तर क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने सोमवारी पुढील ६० दिवसांसाठी आपल्या सर्व क्रिकेट सर्व स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -