घरक्रीडासात्विक-चिरागमध्ये ऑलिम्पिक पदक जिंकण्याची क्षमता, पण...

सात्विक-चिरागमध्ये ऑलिम्पिक पदक जिंकण्याची क्षमता, पण…

Subscribe

- प्रशिक्षक फ्लॅनडी लिंपेले

भारताची पुरुष दुहेरीतील जोडी सात्विकसाईराज रणकिरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी यंदाच्या वर्षी चमकदार कामगिरी केली. त्यांनी थायलंड ओपन स्पर्धेचे जेतेपद पटकावले. सुपर ५०० स्पर्धेच्या पुरुष दुहेरीचे जेतेपद पटकावणारी ही पहिली भारतीय जोडी ठरली. तसेच त्यांनी फ्रेंच ओपनची अंतिम फेरीही गाठली होती. या कामगिरीच्या आधारे त्यांनी जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानी झेप घेतली. भारताच्या या जोडीमध्ये पुढील वर्षी होणार्‍या टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याची क्षमता आहे, पण त्यासाठी त्यांना आपल्या बचावात सुधारणा करावी लागेल, असे मत प्रशिक्षक फ्लॅनडी लिंपेले यांनी व्यक्त केले.

सात्विक-चिरागने यंदाच्या वर्षी खूपच चांगली प्रगती केली. मात्र, त्यांच्या खेळात काही बदल झाले पाहिजेत. त्यांच्यात ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याची क्षमता आहे, पण त्यासाठी त्यांना आपल्या बचावात, योजनांमध्ये आणि कोणत्या वेळी कोणते फटके मारायचे, यात सुधारणा करणे आवश्यक आहे. त्यांचा आक्रमणातील खेळ उत्तम आहे. मात्र, बचावात ते बरेचदा कमी पडतात. त्यामुळे त्यांच्या कामगिरीत सातत्य नाही. ऑलिम्पिकला आता फारसा वेळ उरलेला नाही. या स्पर्धेत दमदार कामगिरी करायची असल्यास त्यांनी खासकरून आपल्या बचावात सुधारणा करण्याची गरज आहे, असे लिंपेले यांनी सांगितले.

- Advertisement -

तसेच दुहेरीतील खेळाडूंना यशस्वी होण्यासाठी त्यांच्या मानसिकतेतही बदल झाला पाहिजे, असे लिंपेले यांना वाटते. ते याबाबत म्हणाले, प्रशिक्षक म्हणून मला काही बदल घडवायचे आहेत. खेळाडूंच्या मानसिकतेत बदल झाला पाहिजे. त्यांनी एकत्रिक खेळले पाहिजे. सात्विक-चिराग मी सांगितलेल्या गोष्टी ऐकतात. त्यामुळेच त्यांचा खेळात सुधारणा झालेली दिसते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -