घरमुंबई‘माथेरानची राणी’ धावू लागली!

‘माथेरानची राणी’ धावू लागली!

Subscribe

पर्यटकांचा प्रचंड प्रतिसाद

पर्यटकांची लाडकी ‘माथेरानची राणी’ अर्थात मिनी ट्रेन यार्डातील पाच महिन्यांच्या सक्तीच्या विश्रांतीनंतर पुन्हा धावू लागली आहे. अमन लॉज ते माथेरान अशी शटल सेवा शुक्रवारपासून सुरू झाली आहे. पहिल्या दिवशी आठ अप आणि आठ डाऊन अशा फेर्‍या होऊन पर्यटकांनी समाधानकारक प्रवासाचा अनुभव घेतला.

जगप्रसिद्ध गिरिस्थान माथेरानची अस्मिता असलेली मिनी ट्रेन दोन दिवसांच्या यशस्वी चाचण्यांनंतर पर्यटकांना घेऊन धावली. ट्रेन येण्याअगोदरच पर्यटकांनी स्थानकात गर्दी केली होती. सकाळी 8.15 वाजता माथेरान स्थानकातून पर्यटकांना घेऊन पहिली ट्रेन निघाली. दर वेळी ही शटल गाडी आठ बोगींची असते. यावेळी मात्र ती सहा बोगींची आहे. यामध्ये 3 बोगी द्वितीय श्रेणीच्या, एक प्रथम श्रेणीची आणि दोन बोगी ब्रेक (गार्ड आणि मालवाहतुकीसाठी) आहेत. एका बोगीत फक्त 30 प्रवासी बसतील इतकीच आसन व्यवस्था आहे. त्यामुळे एका फेरीमध्ये 120 प्रवासीच प्रवास करू शकले.

- Advertisement -

अमन लॉज ते माथेरान या अडीच किलोमीटर अंतरापर्यंतच्या ट्रेन सेवेत 781 प्रवाशांनी प्रवास केला. त्यामध्ये द्वितीय श्रेणीतून 669, तर प्रथम श्रेणीमधून 112 प्रवाशांनी प्रवास केला. माथेरान ते अमन लॉज प्रवास 654 प्रवाशांनी केला. यामध्ये द्वितीय श्रेणी 563 आणि 91 प्रथम श्रेणी प्रवाशांनी प्रवास केला. यामध्ये मध्य रेल्वेला पहिल्याच दिवशी 1 लाख 16 हजार 340 रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. दरम्यान, मिनी ट्रेन सुरू झाल्याने प्रवाशांनी आनंद व्यक्त केला. नेरळ ते अमन लॉजपर्यंतच्या मार्गावर काम सुरू आहे. मार्च ते एप्रिलपर्यंत काम पूर्ण झाल्यानंतर ट्रेनचा पर्यटकांना हवाहवासा वाटणारा मजेशीर प्रवास सुरू होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -