घरक्रीडाVirat Kohli : विराट कोहली दुसऱ्यांदा बनला बापमाणूस, अनुष्का शर्माने दिला मुलाला...

Virat Kohli : विराट कोहली दुसऱ्यांदा बनला बापमाणूस, अनुष्का शर्माने दिला मुलाला जन्म

Subscribe

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली दुसऱ्यांदा वडील बनला आहे. विराटची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने लंडनमध्ये मुलाला जन्म दिला आहे. विराट आणि अनुष्का हे त्यांच्या दुसऱ्या मुलाच्या जन्मासाठी गेल्या महिन्याभरापासून लंडनमध्ये होते. विराट कोहलीने त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्याच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. विशेष म्हणजे विराटने आपल्या मुलाचे नाव अकाय असे ठेवले आहे. (Virat Kohli became a father for the second time Anushka Sharma gave birth to a child)

हेही वाचा – Dhruv Jurel : वडील कारगिल हीरो, तर आईने दागिने विकून दिली होती क्रिकेट किट

- Advertisement -

विराट कोहलीने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की, ‘मी तुम्हा सर्वांना आनंदाने सांगू इच्छितो की, 15 फेब्रुवारी रोजी आमच्या घरी एक छोटा पाहुणा आणि वामिकाचा लहान भाऊ आला आहे. या क्षणी आम्हाला तुमच्या सर्वांचे आशीर्वाद आणि प्रार्थना हवी आहे. आम्ही तुम्हाला आमच्या प्रायव्हसीची विनंती करतो, असे विराटने म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

- Advertisement -

सेलिब्रिटींनी आणि चाहत्यांनी केले अभिनंदन 

विराट कोहली आणि अनुष्का शर्माची पोस्ट व्हायरल होत असून दोघांसाठी त्यांचे चाहले खूप आनंदी आहेत. चाहत्यांनी विराट आणि अनुष्काच्या मुलाला आशीर्वाद देण्यास आणि त्या दोघांचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली आहे. अभिनेता रणवीर सिंग, सोनम कपूर, रकुल प्रीत सिंगसह अनेक सेलिब्रिटींनीही दोघांचे अभिनंदन केले आहे.

हेही वाचा – Sachin Tendulkar : चला पृथ्वीला वाचवूया; मास्टर ब्लास्टरने ट्वीट केला ‘तो’ व्हिडीओ

विराट-अनुष्का 2021 मध्ये पहिल्यांदा बनले आई-वडील

दरम्यान, विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचे 11 डिसेंबर 2017 रोजी लग्न झाले. या दोघांनी इटलीतील टस्कनी याठिकाणी लग्न केले होते. दोघांच्या लग्नात त्यांचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र सहभागी झाले होते. लग्नाच्या तीन वर्षानंतर 11 जानेवारी 2021 रोजी अनुष्का शर्माने एका मुलीचा जन्म झाला. दोघांनी तिचे नाव वामिका असे ठेवले. आता दोघेही पुन्हा एकदा मुलाचे आई-वडील झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -