घरक्रीडाVirat Kohli : क्रिकेटपासून दोन महिने दूर असलेला विराट कोहली IPLमधून कमबॅक...

Virat Kohli : क्रिकेटपासून दोन महिने दूर असलेला विराट कोहली IPLमधून कमबॅक करणार

Subscribe

विराट कोहलीच्या नव्या हेअर स्टाईल आणि लूकचा फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या फोटोमुळे गेल्या दोन महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर असलेला विराट 2024 च्या आयपीएलमधून पुन्हा कमबॅक करणार असल्याचे निश्चित झाले आहे.

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 17 व्या पर्वाची सुरुवात 22 मार्चपासून होणार आहे. आयपीएलचा पहिलाच सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. आयपीएलमध्ये बंगळुरू पहिला सामना खेळणार असल्याने विराट कोहली संघात असणार की नाही, यावरून चाहत्यांमध्ये चर्चेला उधाण आले होते. मात्र आता विराट कोहलीच्या नव्या हेअर स्टाईल आणि लूकचा फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या फोटोमुळे गेल्या दोन महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर असलेला विराट 2024 च्या आयपीएलमधून पुन्हा कमबॅक करणार असल्याचे निश्चित झाले आहे. (virat kohli new hair style look before ipl 2024 first match rcb vs csk)

आयपीएल सुरू होण्यापूर्वी बंगळुरू संघाचा माजी कर्णधार विराट कोहली याचा नवा लुक समोर आला आहे. पॉप्युलर हेअर ड्रेसर अलीम हकीम यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर विराट कोहलीच्या नव्या हेअर स्टाइलचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aalim Hakim (@aalimhakim)

- Advertisement -

विराट कोहली याने आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून आतापर्यंत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या टीमचे प्रतिनिधीत्व केले आहे. आतापर्यंत विराटने 237 सामने खेळले आहेत. विराटने आयपीएलमध्ये 7263 धावा केल्या आहेत. विराट कोहलीने आयपीएलच्या कारकिर्दीत 7 शतकं केली असून 50 अर्धशतकं ठोकली आहेत. विराट कोहलीची सर्वोच्च धावसंख्या 113 ही आहे. कोहलीनं आयपीएलमध्ये 130.02 च्या स्ट्राइक रेटनं आरसीबीसाठी फलंदाजी केली आहे.

अफगाणिस्तान विरुद्धच्या मालिकेनंतर क्रिकेटला कोहलीने लावला ब्रेक

जानेवारी 2024 मध्ये झालेल्या अफगाणिस्तान विरुद्धच्या मालिकेनंतर विराट कोहली याने क्रिकेट खेळलेले नाही. विराट कोहली याने इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतून वैयक्तिक कारणांमुळे माघार घेतली होती. आता विराट कोहली पुन्हा मैदानावर खेळणार असल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

- Advertisement -

आरसीबीचा संघ :

फाफ डु प्लेसिस (कॅप्टन), ग्लेन मॅक्सवेल, विराट कोहली, रजत पाटीदार, अर्जुन रावत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेट कीपर) सुयश प्रभूदेसाई, विल जॅक्स, महिपाल लोमरॉर, करण शर्मा, मनोज भंडागे, मयांक डागर, विजय व्याशक, आकाश दीप, मोहम्मद सिराज, रेसी टॉप्ले, हिमांशू शर्मा, राजन कुमार, कॅमरुन ग्रीन, अल्झारी जोसेफ, यश दयाल, टॉम करन, लॉकी फर्ग्युसन, स्वप्नील सिंह, सौरव


हेही वाचा – Rohit Sharma : वह आ गया…अखेर रोहित शर्माची मुंबई इंडियन्समध्ये एन्ट्री

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -