घरक्रीडाभिवंडीचा वाजिद खान लालबाग श्री

भिवंडीचा वाजिद खान लालबाग श्री

Subscribe

भिवंडी येथील युनिव्हर्सल फिजिक सेंटरच्या वाजिद झहीर खानने लालबाग स्पोर्ट्स क्लब तर्फे होणार्‍या शरीरसौष्ठव स्पर्धेत माजी मारत लालबाग श्री हा किताब जिंकला. ४ गटांत आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा अतिशय रंगतदार झाली.
पहिल्या गटात ४० खेळाडूंमध्ये कल्याणच्या देवा जिमचा पुरुषोत्तम नाईक अव्वल ठरला. तर दुसर्‍या गटात वाजिद झहीर खान जिंकला. या गटात एकूण ५६ शरीरसौष्ठवपटूंनी सहभाग घेतला होता. तिसर्‍या गटात ५६ खेळाडूंनी भाग घेतला होता. या गटात खारेगावच्या अपोलो जिमचा अक्षय कारभारी सर्वोत्तम ठरला. तर चौथ्या गटात एकूण ४८ खेळाडूंमध्ये जुद व्यायामशाळेच्या नदीम नईम शेखने बाजी मारली.या चार विजेत्यांमध्ये लालबाग श्री या मनाच्या किताबासाठी स्पर्धा झाली. त्यात वाजिदने सहजपणे बाजी मारली. त्याला लालबाग श्री या किताबासोबतच २५ हजार रुपये आणि चषक देण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -