घरक्रीडाPAK vs WI : पाकिस्तानविरूध्दच्या मालिकेसाठी वेस्टइंडीजच्या संघाची घोषणा;या नवीन खेळांडूंना मिळाली...

PAK vs WI : पाकिस्तानविरूध्दच्या मालिकेसाठी वेस्टइंडीजच्या संघाची घोषणा;या नवीन खेळांडूंना मिळाली संधी

Subscribe

क्रिकेट वेस्टइंडीजने पाकिस्तानविरूध्द मर्यादित षटकांच्या मालिकेला लक्षात घेऊन एकदिवसीय आणि टी-२० संघाची घोषणा केली आहे

क्रिकेट वेस्टइंडीजने पाकिस्तानविरूध्द मर्यादित षटकांच्या मालिकेला लक्षात घेऊन एकदिवसीय आणि टी-२० संघाची घोषणा केली आहे. पुढील महिन्यात वेस्टइंडीजचा संघ तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळण्यासाठी पाकिस्तानला जाणार आहे. या दौऱ्याची सुरुवात टी-२० मालिकेने होणार आहे. यातील पहिला सामना १३ डिसेंबर रोजी पाकिस्तानच्या कराची मधील आंतरराष्ट्रीय मैदानावर होणार आहे. वेस्टइंडीजच्या संघाचे नेतृत्व कायरन पोलार्डकडे असणार आहे. दरम्यान वेस्टइंडीजच्या संघात मोठा बदल करण्यात आला आहे. दोन्हीही मालिकांसाठी संघाकडून नव्या खेळांडूंना संधी देण्यात आली आहे.

दोन्ही मालिकांसाठी नव्या खेळांडूना संधी

पाकिस्तानविरूध्दच्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकांसाठी वेस्टइंडीजच्या संघाकडून नव्या खेळांडूना संधी देण्यात आली आहे. एकदिवसीय मालिकेसाठी जस्टिन ग्रीव्हज, शामराह ब्रुक्स आणि फिरकीपटू गुडाकेश मोती आणि वेगवान गोलंदाज ओडियन स्मिथ यांना संघात नवीन खेळाडू म्हणून स्थान मिळाले आहे. सोबतच मोतीचा टी-२० मालिकेसाठी देखील समावेश करण्यात आला आहे. त्याच्यासोबतच वेगवान गोलंदाज डॉमिनिक ड्रेक्सला पण संधी देण्यात आली आहे. गुडाकेश मोतीचा टी-२० विश्वचषकादरम्यान राखीव खेळाडू म्हणून संघात समावेश करण्यात आला होता. त्याचवेळी ड्रॅक्स आणि स्मिथ नेट गोलंदाज म्हणून संघासोबत होते.

- Advertisement -

वैयक्तिक कारणांमुळे कित्येत खेळाडू दौऱ्यातून बाहेर

कामाचा ताण पाहता विंडीज क्रिकेटने माजी कर्णधार आणि ऑलराउंडर जेसन होल्डरला विश्रांती दिली आहे. त्याचप्रमाणे आंद्रे रसेल, लेंडल सिमन्स, एविन लुईस, शिमरॉन हेटमायर वैयक्तिक कारणांमुळे या मालिकेत खेळणार नाहीत.

एकदिवसीय मालिकेचा संघ

कायरन पोलार्ड (कर्णधार), शाई होप (उपकर्णधार), डॅरेन ब्राव्हो, शामराह ब्रूक्स, रोस्टन चेस, जस्टिन ग्रीव्हज, अकील होसेन, अल्झारी जोसेफ, गुडाकेश मोती, अँडरसन फिलिप, निकोलस पूरन, रेमन रेफर, रोमन शेफर्ड, ओडियन स्मिथ, हेडन वॉल्श ज्युनियर,

- Advertisement -

टी-२० मालिकेचा संघ

कायरन पोलार्ड (कर्णधार), निकोलस पूरन (उपकर्णधार), डॅरेन ब्राव्हो, रोस्टन चेस, शेल्डन कॉट्रेल, डॉमिनिक ड्रेक्स, शाई होप, अकील होसेन, ब्रँडन किंग, काइल मेयर्स, गुडाकेश मोती, रोमॅरियो शेफर्ड, ओडियन थॉमस, ओशान स्मिथ. हेडन वॉल्श जूनियर,


हे ही वाचा: http://IND vs NZ 1st Test : अश्विनला वारंवार इशारा दिल्याने गावस्कर संतापले; म्हणाले… अंपायरला काय दंड?


 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -