घरताज्या घडामोडीदोन वर्षांच्या कालावधीमध्ये विकासाची कामे झालीच नाहीत, चंद्रकांत पाटील यांचा हल्लाबोल

दोन वर्षांच्या कालावधीमध्ये विकासाची कामे झालीच नाहीत, चंद्रकांत पाटील यांचा हल्लाबोल

Subscribe

एसटी कर्मचाऱ्यांच्या भावनांशी सहमत...

महाराष्ट्र सरकारला २ वर्षे पूर्ण होत आहेत. परंतु काही मुद्दे अधोरेखित करण्याचा मी प्रयत्न करणार असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले. प्रामुख्याने दोन वर्षांच्या कालावधीमध्ये विकासाची कामे काही झालीच नाहीत. रस्त्याची कामं पडून आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली नाहीये. तसेच त्यांची कर्जमाफी थांबलेली आहेत. हे सर्व अद्यापही सुरूच आहे. पैसे कमवा हा एक धंदा मोठ्या प्रमाणात चालला. आम्ही विरोधी पक्षातले नेते आहोत म्हणून आम्ही असं बोलत नाही. परंतु वेगवेगळ्या स्थरावरचे पोलीस अधिकारी अशा प्रकारचे आरोप करत आहेत. त्यानंतर दोन वर्षामध्ये न चुकता झाला तो भ्रष्टाचार. प्रशासनातील अनियमितता असल्यामुळे न चुकता भ्रष्टाचार झाला. असे गंभीर आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मविआ सरकारवर केले आहेत.

चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यामध्ये त्यांनी महाराष्ट्र सरकारला २ वर्षे पूर्ण होत आहेत.त्यावर भाष्य केलं. महाराष्ट्र राज्याची आता अशी स्थिती आले आहे की, प्रशासन आणि व्यवस्थापन पुर्णपणे मोडकळीस आलं आहे. ज्या मुंबई पोलिसांची ख्याती संपूर्ण जगभर होती. मुंबई पोलिसचे कमीशनर परागंधा होते. परंतु आता ते काल-परवा प्रकट झाले आहेत. त्या कमिशनरांनीच गृहमंत्र्यावर आरोप केल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले.

- Advertisement -

एसटी कर्मचाऱ्यांच्या भावनांशी सहमत

भारतीय जनता पार्टी एसटी कर्मचाऱ्यांच्या भावनांशी सहमत आहे. तसेच त्यांच्यासोबत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बिनविरोध निवडणूकाला राज्यात उधाण आलं होतं. तेव्हा परिवहन मंत्री अनिल परब यांनी विरोधी पक्षनेते दवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर दोघांमध्ये एसटी कर्मचाऱ्यांबाबत चर्चा झाल्या. चर्चा झाल्यानंतर अनिल परब यांनी फडणवीसांच्या विचारांना आणि मतांना सहमती दर्शवली होती. राज्याच्या कोविडच्या काळातील जीएसटी हा आतापर्यंत सर्वात जास्त जीएसटी होत आहे. कारण लोकं हे उद्योगशील आहेत. जर तुम्हाला दारू वरचा टॅक्स कमी करता येतो. तर पेट्रोल-डिझेलचा टॅक्स कमी करता का येत नाही. कोविड असताना सुद्धा दारूच्या दुकानांची तुम्हाला काळजी घेता येते, मग एसटी कर्मचाऱ्यांवर तोडगा का? काढत नाहीत. असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी विचारला आहे.

- Advertisement -

लोकसभा २०१९ मध्ये मोदी सरकारला प्रत्यक्षात ३०३ जागा मिळाल्या. बिहारमध्ये सरकार येणार नाही. अशा प्रकारच्या चर्चांणा उधाणं आलं होतं. परंतु तिथेही मुस्लिम महिलांनी मोठ्या प्रमाणात वोटिंग केली होतं. त्यामुळे भाजपला १४ जागा मिळाल्या. तर उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेला ३२४ जागा मिळाल्या. त्यामुळे सर्व्हे करणं आणि प्रत्यक्षात खरी माहिती समोर येणं यामध्ये साम्य नाही. असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

गृहमंत्री अमित शाहांचा महाराष्ट्र दौरा रद्द

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा महाराष्ट्र दौरा रद्द झाला. कारण राष्ट्रपतींचा कार्यक्रम असल्यामुळे त्यांनी दौैरा रद्द केला. परंतु त्यांचा पुणे दौरा येत्या ११ किंवा १२ तारखेला असू शकतो. असं पाटील म्हणाले.


हेही वाचा: Mann Ki Baat : स्वातंत्र्याच्या लढ्यात झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि बुंदेलखंड यांचं मोठं योगदान – पंतप्रधान नरेंद्र मोदी


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -