घरताज्या घडामोडीMann Ki Baat : स्वातंत्र्याच्या लढ्यात झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि बुंदेलखंड यांचं...

Mann Ki Baat : स्वातंत्र्याच्या लढ्यात झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि बुंदेलखंड यांचं मोठं योगदान – पंतप्रधान नरेंद्र मोदी

Subscribe

स्वच्छ भारत अभियानावर जोर...

आस्ट्रेलियामध्ये पर्थ नावाचे शहर आहे. या शहरात क्रिकेटचे सामने होतात. तसेच क्रिकेमप्रेमी यांच्याशी चांगले परिचित आहेत. पर्थमध्ये सॅक्रेड इंडिया गॅलरी या नावाचे एक कलादानही आहे. ऑस्ट्रेलियातील रहिवासी जगत तारिणी दासी यांच्या प्रयत्नांचे हे फळ आहे. तसेच जग तारिणी खरे तर ऑस्ट्रेलियाच्या आहेत. असे पीएम नरेंद्र मोदी यांनी मन की बातमधून सांगितलं. जगत तारिणी यांचा जन्म ऑस्ट्रेलियामध्ये झाला. तिथेच त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. परंतु त्यांनी तेरा वर्षांपेक्षा अधिक काळ वृंदावनात व्यतीत केलं. परंतु स्वातंत्र्याच्या लढ्यात झाशीच्या राणी लक्ष्मीबाई आणि बुंदेलखंड यांचं मोठं योगदान आहे. असं पीएम मोदी म्हणाले.

एका कलाकृतीमध्ये भगवान श्रीकृष्णाच्या जीवनाशी संबंधित अनेक गोष्टी प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. भगवान श्रीकृष्णाने आपल्या करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलला आहे. तसेच गोवर्धन पर्वताच्या खाली वृदांवनातील लोकांनी आश्रय घेतला आहे. तारिणी दासी आपल्या देशात म्हणजेच ऑस्ट्रेलियामध्ये परतल्या आहेत. परंतु त्या वृंदावनाला कधीच विसरू शकल्या नाहीत. त्यामुळे त्यांनी ऑस्ट्रेलियामध्येच वृंदावन बनवलं. कलेच्या माध्यमातून त्यांनी अद्भूत वृंदावन घडवले आणि येथे येणाऱ्या लोकांना अनेक प्रकारची कलाकृती पाहण्यासाठी संधी मिळते. असे पीएम मोदी म्हणाले.

- Advertisement -

ऑस्ट्रेलियाचं नातं हे बुंदेलखंडच्या झाशीशी सुद्धा आहे. झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात कायदेशीर लढाई केली होती. तेव्हा त्यांचे वकिल जॉन लँग होते. ज़ॉन लँग हे मूळ ऑस्ट्रेलियाचे होते. परंतु झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांचा खटला लँग यांनी लढवला होता. स्वातंत्र्याच्या लढ्यात झाशीच्या राणी लक्ष्मीबाई आणि बुंदेलखंड यांचं मोठं योगदान आहे. असं पीएम मोदी म्हणाले.

अमृत महोत्सव शिकण्यासोबतच देशासाठी काहीतरी करायला प्रेरणा देतो. आता देशभरात सामान्य नागरिक असो किंवा सरकार, पंचायतीपासून ते संसदेपर्यंत अमृत महोत्सावाचाच गाजावाजा सुरू आहे. त्यामुळे या महोत्सावासंबंधीत अनेक कार्यक्रम देखील सुरू आहेत. पीएम मोदी यांनी सांगितलं की, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जनसमुदायातील लोक आपल्या योगदानासोबतच जनजातीय गौरवाचा सप्ताह साजरा करतात. देशातील अनेक भागांत यासंबंधीत कार्यक्रम पार पाडण्यात आले आहेत. अंदमान-निकोबार द्वीप समूहात जारवा आणि ओंगे या जनजातीय समुदायाच्या लोकांनी आपल्या संस्कृती अद्यापही जीवंत ठेवली असून त्यांचे प्रदर्शन केले आहे.

- Advertisement -

मन की बात या कार्यक्रमामध्ये पीएम मोदींनी स्वच्छ भारत अभियानावर जोर दिला होता. भारत ड्रोनच्या साहाय्याने गावच्या जमिनीची डिजीटल नोंदणी करत आहे. संपूर्ण जगभरात भारत हा पहिला देश आहे. जो ड्रोनच्या साहाय्याने आपल्या गावच्या जमिनीची डिजिटल स्वरूपात नोंदणी करत आहे. प्रत्येक महिन्यातील शेवटच्या आठवड्यातील रविवारी असं संबोधित केलं जातं. हिमाचल प्रदेशातील उना येथील लघुलेखक राम कुमार जोशींनी सुद्धा एक अद्भुत काम केलं आहे. लहान टपाल तिकिटांवरती नेताजी सुभाषचंद्र बोस आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची अनोखी रेखाचित्रे रेखाटली आहेत.

हिमाचल प्रदेशातील उना येथील लघुलेखक राम कुमार जोशी यांनी सुद्धा एक अद्भुत काम केले आहे.त्यांनी टपाल तिकिटांवरच, म्हणजे इतक्या लहानटपाल तिकिटांवरच नेताजी सुभाषचंद्र बोस आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची अनोखी रेखाचित्रे रेखाटली आहेत. असं मोदी म्हणाले.

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -