घरक्रीडाWimbledon : पायाच्या दुखापतीमुळे गतविजेत्या सिमोना हालेपची माघार

Wimbledon : पायाच्या दुखापतीमुळे गतविजेत्या सिमोना हालेपची माघार

Subscribe

हालेपला सलग दुसऱ्या ग्रँड स्लॅम स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे.

रोमेनियाच्या गतविजेत्या सिमोना हालेपने विम्बल्डन (Wimbledon) स्पर्धेतून माघार घेतली आहे. मागील महिन्यात हालेपच्या पायाला दुखापत झाली होती. त्यातून ती अजून पूर्णपणे सावरू शकलेली नाही. त्यामुळे तिला विम्बल्डनमधून माघार घेणे भाग पडले आहे. मे महिन्यात रोम येथे झालेल्या स्पर्धेतील अँजेलिक कर्बरविरुद्ध दुसऱ्या फेरीच्या सामन्यात हालेपच्या पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे तिला फ्रेंच ओपन स्पर्धेला मुकावे लागले होते. आता तिला सलग दुसऱ्या ग्रँड स्लॅम स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे.

गतविजेती म्हणून खेळण्यासाठी उत्सुक होते

‘पायाला झालेल्या दुखापतीतून अजून पूर्णपणे सावरू न शकल्याने मी विम्बल्डन स्पर्धेतून माघार घेत असल्याचे सांगताना दुःख होत आहे. विम्बल्डनमध्ये खेळता यावे यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न केले. दोन वर्षांपूर्वी मी ही स्पर्धा जिंकले होते आणि यंदा गतविजेती म्हणून या स्पर्धेत मी खेळण्यासाठी उत्सुक होते. परंतु, मला शरीराने साथ दिली नाही,’ असे हालेप तिच्या इंस्टाग्रामवरील पोस्टमध्ये म्हणाली. कोरोनामुळे मागील वर्षी विम्बल्डन स्पर्धा होऊ शकली नव्हती. यंदा या स्पर्धेच्या पहिल्या फेरीला २८ जूनपासून सुरुवात होणार आहे.

- Advertisement -

जोकोविचपुढे ब्रिटनच्या जॅक ड्रापरचे आव्हान 

पुरुषांमध्ये गतविजेत्या नोवाक जोकोविचपुढे विम्बल्डनच्या पहिल्या फेरीत ब्रिटनच्या १९ वर्षीय जॅक ड्रापरचे आव्हान असेल. जोकोविचने आतापर्यंत पाच वेळा विम्बल्डनचे जेतेपद पटकावले असून यंदा त्याला एकूण १९ वे ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावण्याची संधी आहे. तर दुसरीकडे ड्रापरची ही विम्बल्डनमध्ये खेळण्याची पहिलीच वेळ असणार आहे.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -