घरCORONA UPDATEलस घेण्यासाठी निघाला आणि घाबरून झाडावर चढला

लस घेण्यासाठी निघाला आणि घाबरून झाडावर चढला

Subscribe

कोरोना विषाणूविरोधात लढण्यासाठी एकमेव उपाय म्हणजे लसीकरण. त्यामुळे शहरापासून ते अगदी खेडेगावांपर्यंत कोरोनाविरोधी लसीकरण मोहिम वेगाने सुरु आहे. तसेच नागरिकांमध्येही लसीकरणासंदर्भात वेगवेगळ्या पद्धतीने जनजागृती केली जात आहे. मात्र अद्यापही अनेक भागांत लसीकरणासंदर्भात गैरसमज पसरले असून त्याचा परिणाम सर्व कुटुंब किंवा आसपासच्या नागरिकांना भोगावे लागत आहे. असाच काहीसा प्रकार नुकताच मध्य प्रदेशच्या राजगडमध्ये घडला आहे. जिह्यातील पाटन कला गावातील एक युवक लसीला घाबरून चक्क झाडावर जाऊन बसला.

लसीकरण केंद्रावरील लस संपत नाही तोपर्यंत हा युवक झाडावरून अजिबात खाली उतरला नाही. कंवरलाल असे या युवकाचे नाव आहे. कंवरलालला लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी बोलवण्यात आले. यावेळी गावातील नागरिकांनी कंवरलालच्या पत्नीला लस घेण्यासाठी तयार केले आणि ते लसीकरण केंद्रावर पोहचले. मात्र लसीपासून वाचण्याचा प्रयत्न करणारा कंवरलाल या घटनेची माहिती मिळाली. यावेळी कंवरलालने घरात येऊन पत्नीचे आधार कार्ड घेऊन पळत काढत झाडावर जाऊन बसणे पसंत केले. जोपर्यंत लसीकरण केंद्रावर लस संपत नाही तोपर्यंत तो झाडावर बसून होता.

- Advertisement -

कंवरलालच्या मनात अशी भीती होती की, लस घेतल्यानंतर ताप येतो आणि नंतर अधिक त्रास होतो. या कारणामुळेच तो स्वत:ही लस घेत नव्हता आणि पत्नीलाही लस घेण्यापासून रोखत होता. परंतु गावातील इतर नागरिकांमध्ये लसीकरणासंदर्भात जनजागृती पाहयला मिळत असून मोठ्यासंख्येने नागरिक लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रांवर गर्दी करत आहेत. परंतु कंवरलालसारख्या काही नागरिकांमध्ये अद्यापही लसीकरणासंदर्भात भीती पाहयला मिळत आहे. यावर बीएमओ डॉ. राजीव हरिऔध सांगतात, जो व्यक्ती लसीला घाबरून लस घेण्यास तयार नाही त्याची माहिती आमच्या टीमला मिळाली आहे. त्यामुळे आमची टीम लवकरंच त्याच्या घरी समजवण्यासाठी जाईल आणि लसीबाबत त्याला जागरुक करण्याचा प्रयत्न करेल, त्यानंतर त्याला लस दिली जाईल.


सांगलीकर सईची बोल्ड, ग्लॅमरस अदा

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -