घरक्रीडाWorld Cup 2019: या बॅड न्यूजमुळे दक्षिण आफ्रिकेचा यंदाही होणार 'चोकर्स'?

World Cup 2019: या बॅड न्यूजमुळे दक्षिण आफ्रिकेचा यंदाही होणार ‘चोकर्स’?

Subscribe

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनला दुखापतीमुळे विश्वचषक स्पर्धेतून बाहेर जावे लागले आहे. हा विश्वचषक स्टेनचा शेवटचा विश्वचषक होता. दक्षिण आफ्रिकेला जेतेपद मिळवून देण्याचे स्टेनचे स्वप्न होते. मात्र, यापासून त्याला मुकावे लागले आहे.

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनला खांद्याच्या दुखापतीमुळे विश्वचषक स्पर्धेतून बाहेर जावे लागले आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या संघाला मोठा फटका बसला आहे. डेल स्टेन हा आक्रमक आणि प्रभावी असा गोलंदाज आहे. याशिवाय त्याचा हा शेवटचा विश्वचषक होता. मात्र दुखापतीमुळे त्याला विश्वचषक स्पर्धेला मुकावे लागले आहे. दरम्यान, विश्वचषक सुरु होण्याअगोदर स्टेनने आपण आपल्या संघाला यावर्षीचा विश्वचषक कप मिळवून देऊ, असे म्हटले होते. विश्वचषकाचे जेतेपद मिळवून देण्याचे स्टेनचे स्वप्न होते. मात्र, दुखापतीमुळे त्याला संघातून बाहेर जावे लागले.

हेही वाचा – World Cup 2019: पावसाने घात केला, रंगात आलेला सामना थांबला

- Advertisement -

ब्युरोन हॅन्ड्रिक्सला संघात जागा

बुधवारी भारतीय संघाचा विश्वचषक स्पर्धेतील सलामी सामना आहे. हा सामना दक्षिण आफ्रिकेसोबत असणार आहे. या संघात खेळण्यासाठी डेल स्टेनच्या प्रकृतीची तपासणी केली गेली. खांद्याच्या दुखापतीमुळे डेल स्टेनला फक्त उद्याचाच सामना नाही तर संपूर्ण विश्वचषक स्पर्धेतून बाहेर काढण्यात आले आहे. डेलच्या ऐवजी वेगवान गोलंदाज ब्युरोन हॅन्ड्रिक्सला संघात जागा दिली गेली आहे.

स्टेनच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह

खांद्याच्या दुखापतीमुळे डेल स्टेनच्या भविष्यावर प्रश्न उपस्थित होत आहेत. डेलची भविष्यात खेळण्याची शक्यता कमी आहे, असे आयसीसीने सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -