घरदेश-विदेशएएन -३२ विमानाच्या उड्डाणावेळी पायलटची पत्नी एअरबेसवर होती तैनात

एएन -३२ विमानाच्या उड्डाणावेळी पायलटची पत्नी एअरबेसवर होती तैनात

Subscribe

आशिष तंवर चालवत असलेले विमान बेपत्ता झाल्याची माहिती कळताच पलवल येथील आशिषच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

भारतीय वायुदलाचे एएन- ३२ या विमानाने आसामच्या जोरहाट एयरबेसवरुन उड्डाण घेतल्यानंतर ते बेपत्ता झाले. भारतीय वायुदलाकडून या विमानाचा शोध सुरु आहे. या विमानाला पायलट आशिष तंवर चालवत होते. आशिष हरियाणाच्या पलवल येथे राहणारे आहेत. त्यांची पत्नी संध्या तंवर आणि बहिण भारतीय वायुसेनेत तैनात आहेत. आशिषची पत्नी संध्या एअर ट्राफिक कंट्रोलमध्ये काम करते.

पायलटची बायको आणि बहिण वायुदलात

जेव्हा आशिष तंवरने आसामच्या जोरहाट एअरबेसवरुन उड्डाण घेतले त्यावेळी त्याची पत्नी संध्या तंवर जोरहाट एअरबेसवर ड्यूटीवर होती. आशिष तंवर आणि त्यांची पत्नी संध्या तंवर हे सुट्टी संपवून १८ मे रोजी कामावर रुजू झाले होते. आशिष तंवर चालवत असलेले विमान बेपत्ता झाल्याची माहिती कळताच पलवल येथील आशिषच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

- Advertisement -

यांच्यामार्फत विमानाचा शोध सुरु

दरम्यान, मंगळवारी भारतीय वायुसेनेने सांगितले की, बेपत्ता एएन- ३२ विमानाचा शोध युध्द पातळीवर घेतला जात आहे. यासाठी शोध मोहिम राबली जात आहे. या शोध मोहिमेमध्ये भारतीय नौदलाचे पी -८ आय, RISAT सॅटेलाइट, मल्टी सेंसर लेस एयरक्राफ्ट लागले आहे. भारतीय लष्कर आणि सरकारी यंत्रणांची मदत घेतली जात आहे. भारतीय वायुसेनेला शोध मोहिमेदरम्यान हिमालयात ६ गिर्यारोहकांचे मृतदेह सापडले. जवळपास एक आठवड्यापूर्वी नंदा देवी पर्वतावर ८ गिर्यारोहकांचे एक टीम बेपत्ता झाली होती.

असे झाले विमान बेपत्ता ?

भारतीय वायुदलाचे एएन- ३२ या विमानाने सोमवारी दुपारी आसामच्या जोरहाट एयरबेसवरुन उड्डाण घेतले होते. उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या काही मिनिटामध्ये अरुणाचल प्रदेशच्या मेचुका एयरफील्डवरुन ते बेपत्ता झाले. हा भाग चीनच्या सीमेपासून जवळ आहे. जोरहाट एयरबेसवरुन या विमानाने सोमवारी १२ वाजून २५ मिनिटाने उड्डाण घेतले होते. त्यानंतर या विमानाचा संपर्क दुपारी १ वाजता तुटला. या विमानामध्ये ८ क्रू मेंबर आणि ५ प्रवासी असे एकूण १३ जण प्रवास करत होते.

- Advertisement -

हेही वाचा – 

इस्त्रोचा उपग्रह घेणार बेपत्ता एएन- ३२ विमानाच्या शोध

वायुदलाचे एएन-३२ विमान बेपत्ता; १३ जण करत होते प्रवास

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -