घरक्रीडाहुंड्याशिवाय कुस्तीपटू बबिता फोगाटने केलं पैलवान विवेकशी लग्न

हुंड्याशिवाय कुस्तीपटू बबिता फोगाटने केलं पैलवान विवेकशी लग्न

Subscribe

बबिता-विवेक यांनी आठ फेरे घेतले असून आठवा फेरा हा 'बेटी बचाओ-बेटी पढ़ाओ'चा दिला संदेश

प्रसिद्ध भारतीय महिला कुस्तीपटू बबिता फोगाटने रविवारी संध्याकाळी भारत केसरी पैलवान विवेक सुहाग याच्याशी लग्नगाठ बांधली आहे. विशेष म्हणजे या दोघांनी लग्नात सात फेरे न घेता आठ फेरे घेतले. साधारण लग्नात सात फेरे म्हणजेच सप्तपदीला महत्त्व असते. पण बबिता-विवेक यांनी आठ फेरे घेतले असून आठवा फेरा हा ‘बेटी बचाओ-बेटी पढ़ाओ’चा संदेश देण्यासाठी घेतला. यासह दोघांनी एक-एक रोपटं लावत पर्यावरणाचे संवर्धन करण्याचा देखील संदेश दिला आहे.

- Advertisement -

हे लग्न हुंड्याशिवाय पार पडले असून अगदी पारंपरिक पद्धतीने हा विवाह सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याला केवळ २१ वऱ्हाडी उपस्थित होते. शिवाय हे लग्न केवळ नाममात्र एक रुपया घेऊन ठरवलं गेलं होतं. बलाली या गावात अत्यंत साध्या-सोप्या पद्धतीने हे लग्न पार पडले. बबिता-विवेक या समारंभाला कुटुंबीयांसोबत काही परदेशी कुस्तीपटूही आले होते. या आनंदी सोहळ्याचे क्षण तिच्या बहिनीने गीता फोगाटने ट्वीटर अकाऊंटद्वारे लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.

यापूर्वी बबिताने फोगाटने तिच्या ट्विटर अकाऊंटवरून आपल्या लग्नाच्या विधींचे फोटो शेअर केले होते.

- Advertisement -


हेही वाचा – यंग ब्रिगेडचा अचूक ‘वेध’!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -