घरटेक-वेकAsus चा गेमिंग स्मार्टफोन ROG Phone 3 आज भारतात लाँच होणार

Asus चा गेमिंग स्मार्टफोन ROG Phone 3 आज भारतात लाँच होणार

Subscribe

तैवानची स्मार्टफोन कंपनी Asus आज भारतात आपला नवीन गेमिंग स्मार्टफोन बाजारात आणत आहे. ROG Phone 3 ऑनलाईन पद्धतीने लाँच केला जाणार आहे. ROG Phone 3 ची जागतिक लाँचिंग आहे आणि त्याद्वारे कंपनी भारतातही याची घोषणा करणार आहे. या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉमचा फ्लॅगशिप प्रोसेसर Snapdragon 865+ देण्यात आला आहे.

अहवालानुसार या गेमिंग स्मार्टफोनमध्ये 6000mAh बॅटरी देण्यात येईल. या स्मार्टफोनविषयी काही माहिती लीक झाली आहे. लीक झालेल्या माहितीनुसार, त्यात 6.59 इंचाचा फुल एचडी प्लस AMOLED डिस्प्ले देण्यात येणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट स्क्रीन असेल. हा एक गेमिंग फोन असल्याने, त्यास हाय रीफ्रेश रेट आवश्यक आहे. याशिवाय अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनरही देण्यात येणार आहे.

- Advertisement -

ROG Phone 3 मध्ये फोटोग्राफीसाठी 64MPचा प्रायमरी कॅमेरा दिला जाऊ शकतो. या स्मार्टफोनमध्ये तीन रियर कॅमेरे दिले जाऊ शकतात. त्यात कमीतकमी बेझल असतील. या फोनचा सेकंडरी कॅमेरी 13MPचा असेल. Republic Of Gaming चं प्रतीक मागील पॅनेलवर असेल. लाँच इव्हेंट रात्री ८.३० वाजता सुरू होईल आणि याचं थेट प्रक्षेपण कंपनीच्या अधिकृत YouTube चॅनेलवर पाहू शकता.


हेही वाचा – बहुप्रतीक्षित OnePlus Nord आज लाँच होणार

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -