धक्कादायक! दिल्लीतील एम्स रुग्णालयात सायबर हल्ला? रुग्णसेवा खंडित

डिजिटल सेवा पुनर्संचयित करण्यासाठी पावले उचलली जात आहेत आणि इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) आणि NIC ची मदत घेतली जात आहे. तसंच, भविष्यात अशा घटना पुन्हा टाळण्यासाठी एम्स आणि एनआयसीकडून योग्य ती खबरदारी घेतली जाईल, असंही सांगण्यात येतंय. 

delhi police file fir in aiims delhi ransomware attack

नवी दिल्ली – देशाची राजधानी दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (All India Institute of Medical Sciences) मध्ये सायबर हल्ला (Cyber Attack) झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. काल रात्रीपासून सर्व्हरमधील बिघाडामुळे रुग्णालयात रुग्ण नोंदणी आणि नमुना संकलनाची प्रक्रिया ठप्प झाली आहे. यामुळे, केंद्रीय सायबर यंत्रणा आणि इतर गुप्तचर यंत्रणा या प्रकरणाचा तपास करण्यासाठी घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. तसंच, हे प्रकरण आता गृह मंत्रालयापर्यंत पोहोचले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रणाली पूर्णपणे बंद आहे आणि एजन्सी ती पुन्हा सुरू करण्याच्या प्रक्रियेत आहेत. ऑनलाईन यंत्रणा बंद पडल्याने रुग्णांची देखभाल व्यवस्था विस्कळीत झाली असून याप्रकरणी दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. एम्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा मोठा सायबर हल्ला असल्याची शंका उपस्थित करत सरकारी पातळीवर प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

रुग्ण सेवा प्रणाली प्रभावित

ज्या सिस्टीमवर पेशंट केअर सिस्टीम आधारित आहे त्यावरच सायबर हल्ला झाल्याचं सांगण्यात येतंय. इतर इंटरनेट सेवा कार्यरत आहेत, परंतु बिलिंगवर परिणाम झाला आहे. रॅन्समवेअर हल्ल्यामुळे सर्व्हर डाऊन झाल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. बुधवारी संध्याकाळी जारी केलेल्या निवेदनात रुग्णालय प्रशासनाने सांगितले की, संध्याकाळी 7.30 वाजेपर्यंत सेवा मॅन्युअली दिली जात होती.

रुग्णालय प्रशासनाने सांगितले की, “एम्स नवी दिल्ली येथे वापरल्या जाणार्‍या नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरच्या ई-हॉस्पिटलचा सर्व्हर आज डाऊन झाला होता, ज्यामुळे स्मार्ट लॅब, बिलिंग, अहवाल तयार करणे, अपॉइंटमेंट सिस्टम इत्यादींसह अनेक सेवा प्रभावित झाल्या आहेत. या सर्व सेवा सध्या मॅन्युअल मोडवर चालत असल्या तरी.”

सर्व्हरवर रॅन्समवेअर हल्ला

AIIMS ने एका निवेदनात म्हटले आहे की, AIIMS मध्ये काम करणाऱ्या नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरच्या (NIC) टीमने माहिती दिली आहे की हा रॅन्समवेअर हल्ला असू शकतो. कायद्याची अंमलबजावणी करणारे अधिकारी याची चौकशी करतील. एम्सच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “सर्व्हर बंद झाल्यामुळे स्मार्ट लॅब, बिलिंग, अहवाल तयार करणे आणि अपॉइंटमेंट सिस्टमसह ओपीडी आणि आयपीडी डिजिटल हॉस्पिटल सेवा प्रभावित झाल्या आहेत.”

डिजिटल सेवा पुनर्संचयित करण्यासाठी पावले उचलली जात आहेत आणि इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) आणि NIC ची मदत घेतली जात आहे. तसंच, भविष्यात अशा घटना पुन्हा टाळण्यासाठी एम्स आणि एनआयसीकडून योग्य ती खबरदारी घेतली जाईल, असंही सांगण्यात येतंय.