Eco friendly bappa Competition
घर टेक-वेक ट्विटरला मोठा झटका! एलॉन मस्कच्या अल्टिमेटमनंतर कर्मचाऱ्यांनी स्वतःहून सोडली नोकरी

ट्विटरला मोठा झटका! एलॉन मस्कच्या अल्टिमेटमनंतर कर्मचाऱ्यांनी स्वतःहून सोडली नोकरी

Subscribe

दरम्यान, ट्विटर कंपनी गेल्या काही दिवसांपासून तोट्यात आहे. त्यामुळे ट्विटरने सबस्क्र्बिप्शन योजनाही सुरू केली आहे. तसंच, कर्मचारी कमी करून ते रेव्हेन्यू वाढवू इच्छितात. म्हणूनच, मोठ्या प्रमणात कर्मचारी कमी करण्यात येत आहे.

नवी दिल्ली – एलॉन मस्क यांनी ट्विटरची मालकी (Twitter CEO Elon Musk) घेतल्यानंतर अनेक बदल केलेत. ट्विटरच्या धोरणात ३६० डिग्रीमध्ये त्यांनी बदल करण्याचे धोरण निश्चित केले आहे. यासाठी त्यांनी कर्मचाऱ्यांनाही (Recession in Twitter) तंबी दिली आहे. त्यानुसार, नोकरी टिकवायची असेल तर जास्त वेळ काम करावं लागेल, असा मेल एलॉन मस्क यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना पाठवला होता. त्यानुसार, अनेक कर्मचाऱ्यांनी स्वतःहून राजीनामा (Twitter Employees Resigned) सुपूर्द केला आहे. यामुळे टेकविश्वात मोठी खळबळ माजली आहे.

हेही वाचा – नोकरी टिकवायचीय? मग जास्त काम करा, ट्विटरच्या कर्मचाऱ्यांसाठी नवा फतवा

- Advertisement -

दोन दिवसांपूर्वी एलॉन मस्क यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना मेल केला होता. ट्विटरच्या यशस्वीतेसाठी आपल्याला अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे. अधिक मेहनतीसह जास्त वेळ काम करावं लागेल. या अटी मान्य असतील तरच नोकरी टीकेल, असा मेल एलॉन मस्क यांनी सर्व कर्मचाऱ्यांना पाठवला होता. तसंच, या अटी मान्य असतील तर लिंकवर दिलेल्या ‘होय’वर क्लिक करा. ‘नाही’वर क्लिक केल्यास संबंधित कर्मचाऱ्यांना तीन महिन्याची नोटीस देण्यात येणार आहे. मात्र, हा मेल प्राप्त होताच, अनेक कर्मचाऱ्यांनी स्वतःहून राजीनामा दिला आहे.

आतापर्यंत किती कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला याची अधिकृत माहिती आलेली नाही. परंतु तीन ट्विटर कर्मचार्‍यांनी याविषयी माहिती दिली आहे. एका अभियंत्याने सांगितले, “उत्तम पायाभूत सुविधांचे प्रतिनिधित्व करणारी संपूर्ण टीम स्वेच्छेने कंपनी सोडत आहे… आम्ही अनेक पर्यायांसह कुशल व्यावसायिक आहोत, त्यामुळे एलॉन आम्हाला राहण्याचे कोणतेही कारण दिले नाही आणि बरेच जण निघून जात आहेत.”

- Advertisement -

हेही वाचा – कोणताही सीईओ कायद्यापेक्षा मोठा नाही, नियामक मंडळाची एलॉन मस्कला तंबी

एलॉन मस्कने ट्विटरची मालकी घेतल्यापासून त्याने कर्मचाऱ्यांवर बडगा उगारला आहे. सर्वांत आधी त्यांनी ९० टक्के भारतीय कर्मचाऱ्यांना नारळ दिला. त्यानंतर, हळूहळू अनेक कर्मचाऱ्यांना त्यांनी कामावरून कमी केलं. तसंच, ट्विटरमध्ये ज्या कर्मचाऱ्यांची गरज नाही, त्या कर्मचाऱ्यांना थेट काढून टाकण्यात आलं आहे. ट्विटरचे सीईओ पराग अग्रवालसह मोठ्या पदावरील अनेक अधिकाऱ्यांना एलॉन मस्कने यांनी काढून टाकलं. तसंच, व्यवस्थापनाच्या निर्णयाविरोधात ज्यांनी कृती केली आहे, त्या कर्मचाऱ्यांनाही कमी करण्यात आलं आहे.

दरम्यान, ट्विटर कंपनी गेल्या काही दिवसांपासून तोट्यात आहे. त्यामुळे ट्विटरने सबस्क्र्बिप्शन योजनाही सुरू केली आहे. तसंच, कर्मचारी कमी करून ते रेव्हेन्यू वाढवू इच्छितात. म्हणूनच, मोठ्या प्रमणात कर्मचारी कमी करण्यात येत आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -