घरटेक-वेकगुगलच्या 'लोकेशन-ट्रॅकिंगवर' गुगलने दिले स्पष्टीकरण

गुगलच्या ‘लोकेशन-ट्रॅकिंगवर’ गुगलने दिले स्पष्टीकरण

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून गुगलच्या सर्चमधील लोकेशन हिस्ट्री आपोआप ट्रॅक होत असल्याचे अनेक युजर्सच्या लक्षात आले. लोकेशन सर्चचा पर्याय बंद करुन देखील असे का होत आहे? असा प्रश्न अनेकांना पडला होता.

गुगलवर काहीही सर्च करताना तुम्हाला तुमचे ‘लोकेशन’ वापरायचे की नाही यासाठी एक पॉपअप विंडो येते. पण जर तुम्ही तुमचे लोकेशन बंद केले असेल तर तो पर्याय येत नाही. पण गेल्या काही दिवसांपासून गुगलच्या सर्चमधील लोकेशन हिस्ट्री आपोआप ट्रॅक होत असल्याचे अनेक युजर्सच्या लक्षात आले. लोकेशन सर्चचा पर्याय बंद करुन देखील असे का होत आहे? असा प्रश्न अनेकांना पडला होता. आता खुद्द गुगलनेच या संदर्भातील अधिकृत माहिती दिली असून डेली मेलने दिलेल्या बातमीनुसार गुगल मॅपमधील हिस्ट्री सेव्ह झाल्यानंतर हे प्रकरण समोर आले आहे.

काय दिले गुगलने उत्तर ?

काही दिवसांपूर्वी गुगलला या संदर्भात विचारणा केल्यावर त्यांनी यावर काम सुरु असल्याचे सांगितले होते. पण आता अधिक चांगल्या सोयीसाठी आणि मदत केंद्रांना अचूक माहिती देत असल्याचे स्पष्टीकरण गुगलने दिले आहे, या दोन वेगळ्या स्पष्टीकरणामुळे मात्र लोकांमध्ये गोंधळ होत असल्याचे अनेकांनी म्हटले आहे. शिवाय अशा पद्धतीने गुगलने लोकेशनची हिस्ट्री सेव्ह करणे चुकीचे आहे, असे देखील म्हटले आहे.

- Advertisement -

नेमके काय झाले?

गुगल मॅप वापरताना लोकेशन हिस्ट्रीचा पर्याय बंद ठेवलेला असताना सुद्धा या फोनमध्ये लोकेशन सेव्ह झाले होते. एकाने या लोकेशन हिस्ट्रीचा फोटो पाठवला, असे का होत आहे हे देखील विचारले. पण गुगलने दिलेले स्पष्टीकरण अनेकांना पटलेले नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -