घरटेक-वेकआता WhatsApp मध्ये Amazon-Flipkart सारखे फीचर्स!

आता WhatsApp मध्ये Amazon-Flipkart सारखे फीचर्स!

Subscribe

सोशल मीडियावरील सर्वाधिक युजर्स असणारे अॅप्लिकेशन म्हणजे WhatsApp. गेल्या काही दिवसांपासून WhatsApp आपल्या युजर्ससाठी नव-नवे फीचर्स आणत आहेत. WhatsApp मधील शॉपिंग एक्सपिरिअन्सवर अधिक लक्ष केंद्रित करत आहे. हा कंपनीच्या स्ट्रॅटिजीचा एक भाग असून अलीकडेच व्हॉट्सअ‍ॅप बिझिनेसमध्ये खरेदीसाठी एक बटण देण्यात आले होते.

व्हॉट्सअ‍ॅपने आता कार्ट्स सुरू केले आहेत. लेटेस्ट अपडेटमध्ये Add to cart या बटणावर क्लिक करून शॉपिंग करता येणार आहे. जर तुम्ही कोणतीही ई-कॉमर्स सेवा वापरली असेल तर तुम्हाला Cart किंवा Add to cart या फीचर्सबद्दल माहिती असेलच. मात्र whatsapp business अकाऊंटमध्ये प्रोडक्ट्सचे कॅटलॉग देखील मिळतात आणि याच नव्या फीचर्सच्या माध्यमातून Cart मध्ये अॅड केले जाऊ शकते. या नव्या फीचर्सच्या माध्यमातून वेगवेगळ्या व्यापाऱ्यांकडून शॉपिंग करण्यास मदत होणार आहे.

- Advertisement -

whatsapp च्या Cart फीचर अंतर्गत तुम्ही कोणतीही वस्तू Cart मध्ये ठेवल्यास त्या वस्तूस कधीही काढू शकता. हे वैशिष्ट्य whatsapp business अकाऊंटकरता देखील असल्याचे सांगितले जात आहे. परंतु सामान्य खरेदीकर्त्याने काही शॉपिंगसाठी मर्चंट अकाऊंटवर भेट दिली तर हे पर्याय देखील उपलब्ध होऊ शकतात. कंपनी सतत whatsapp business चा विस्तार करण्यास प्रयत्नशील आहे. whatsapp वर जास्तीत जास्त छोटे व्यवसाय यावेत अशी कंपनीची इच्छा आहे, जेणेकरून Amazon-Flipkart सारखे फीचर्सचा वापर वाढेल आणि अधिकाधिक फायदा होईल.

दरम्यान, whatsapp ने भारतात यापूर्वी WhatsApp Pay देखील लाँच केले आहे. फेसबुकच्या मालकीचे मेसेजिंग App WhatsApp ला भारतात पेमेंट सर्व्हिस सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे आता WhatsApp वरुनही पैसे पाठवता येणार आहेत. या फीचर्समुळे देखील whatsapp business ला देखील फायदा मिळू शकतो, अशी कंपनीची अपेक्षा आहे.

- Advertisement -

चॅटिंगच्या माध्यमातून वस्तूंची खरेदी शक्य

बिझनेस अकाऊंटमध्ये तुम्हाला शॉपिंग आयकॉन दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर समोरील अकाऊंटद्वारे विक्री होत असलेल्या प्रोडक्टची यादी दिसेल. त्यानंतर केवळ चॅटिंगच्या माध्यमातून तुम्ही वस्तूंची खरेदी करु शकता. WhatsApp चा सध्या सुपर अॅप बनण्याकडे प्रवास सुरु झाला आहे.


आता WhatsApp द्वारे करता येणार Shopping; जाणून घ्या नवं फीचर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -