घरthaneकेडीएमसीच्या सचिवांची तडकाफडकी उचलबांगडी

केडीएमसीच्या सचिवांची तडकाफडकी उचलबांगडी

Subscribe

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे तब्बल सात वर्षे सचिव पदावर विराजमान असणारे तसेच या व्यतीरिक्त दोन विभागाचा पदभार सांभाळणारे संजय जाधव यांची सचिव पदावरून आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी तडकाफडकी उचल बांगडी केली. संजय जाधव यांच्याकडे उद्यान अधीक्षक आणि जनसंपर्क विभागाचा कार्यभार देण्यात आला होता. हे दोन्ही विभाग सांभाळत असताना सचिव पदाचे महत्त्वाचे विभाग जाधव यांना 1 डिसेंबर 2016 रोजी तत्कालीन आयुक्तांनी सुपूर्द केले होते. सचिव पदावर त्यांची वर्णी लावल्याने अनेकांनी त्यांच्या या नियमबाह्य नियुक्तीला मंत्रालयापर्यंत हरकती घेतल्या होत्या. मात्र सात वर्षात मंत्रालयातील संबंधित विभागानेही अर्जदारांच्या निवेदनाला केराची टोपली दाखविण्यात धन्यता मानली होती.

संजय जाधव यांच्याकडे तांत्रिक पद असल्याचे सर्वच वरिष्ठ अधिकार्‍यांना माहीत होते. मात्र तरीही कसलीही तमा न बाळगता सचिव पदावर त्यांना रुजू करण्यात तत्कालीन आयुक्तांनी आढेवेढे न घेता मान्यता दिली होती. यामुळे जाधव यांच्या मूळ वेतनात मोठ्या प्रमाणात फरक पडल्याची माहिती चर्चेतून समजते. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असताना केडीएमसीचे प्रशासक तथा आयुक्त डॉक्टर भाऊसाहेब दांगडे यांनी सचिव पदाचे अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे संजय जाधव यांच्या अचानक बदलीचे आदेश काढत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.
संजय जाधव यांच्या ऐवजी सचिव पदावर उपायुक्त असणारे धैर्यशील जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

- Advertisement -

जाधव यांनी उद्यान अधीक्षक या मूळ पदावर रुजू होण्याचे आदेशही आयुक्तांनी काढले आहे. गेल्या कित्येक वर्षापासून केडीएमसीचे उपसचिव म्हणून कामकाज पाहत असणारे किशोर शेळके यांना अनुभवाने सचिव पदावर नियुक्ती करणे गरजेचे असतानाही त्यांना पुन्हा एकदा पदाने हुलकावणी दिल्याची माहिती आहे. दरम्यान बदली आदेशात आयुक्त डॉक्टर भाऊसाहेब दांगडे यांनी जाधव यांना सचिव पदावरून हटवित त्यांना पूर्ववत उद्यान अधीक्षकांचा मूळ पदाचा कार्यभाग सांभाळावा असे म्हटले आहे. मात्र संजय जाधव यांच्याकडे माहिती व जनसंपर्क विभागाचाही कार्यभार असून याबाबत बदली आदेशात काही उल्लेख नसल्याचे उद्यान व जनसंपर्क हे दोन स्वतंत्र विभाग जाधव यांच्याकडेच राहणार असल्याचे बोलले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -