घरठाणेएक रुपयात पिक विमा योजनेत 31 जुलैपर्यंत अर्ज भरावे- जिल्हाधिकारी अशोक शिनगारे

एक रुपयात पिक विमा योजनेत 31 जुलैपर्यंत अर्ज भरावे- जिल्हाधिकारी अशोक शिनगारे

Subscribe

शेतकर्‍यांच्या उत्पादनाला नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण मिळावे, यासाठी राज्य शासनाने एक रुपयात सर्वसामावेश पिक विमा देणार आहे. या पिक विम्यासाठी ठाणे जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी 31 जुलैपूर्वी अर्ज करावा,असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे. जिल्हाधिकारी शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा अभियान समितीची बैठक झाली. त्या बैठकीत जिल्हाधिकार्‍यांनी कृषि विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी पिक विमा योजनेत जिल्ह्यातील 100 टक्के शेतकर्‍यांचा सहभाग असावा, यासाठी कृषि विभाग, विमा कंपन्या व महसूल प्रशासनाने प्रयत्न करण्याचे निर्देश दिले. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दीपक कुटे, आत्माचे प्रकल्प संचालक विनायक पवार, जिल्हा परिषदेच्या कृषि अधिकारी सारिका शेलार, उत्तर कोकण विभागाचे विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ. रविंद्र मर्दाने, युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीचे उपमहाव्यवस्थापक जयदीप सिन्हा यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

प्रधानमंत्री पिक विमा योजना, पुर्नरचित हवामानावर आधारित फळ पिक विमा योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना, कृषी पायाभूत सुविधा योजना, कृषि यांत्रिकीकरण योजना, महात्मा गांधी रोजगार हमी योजना, एकात्मिक फलोत्पादन अभियान, अन्न व पोषण सुरक्षा योजना या योजनांचा आढावा यावेळी घेण्यात आला. जिल्हास्तरीय आत्मा नियामक मंडळाची यावेळी बैठक झाली.
जिल्हाधिकारी शिनगारे म्हणाले की, शेतकर्‍यांना विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेतमालाचे नुकसान सोसावे लागते. हे नुकसान कमी करण्यासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना लागू केली आहे.

- Advertisement -

या योजनेत सुधारणा करून राज्य शासनाने एक रुपयात सर्वसमावेशक पिक विमा योजना यंदापासून राबविण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील सर्व खातेदार व बिगर खातेदार तसेच कर्जदार व बिगर कर्जदार शेतकर्‍यांच्या पिकाचा विमा काढण्यात यावा. यासाठी कृषि विभाग, संबंधित विमा कंपनी, महसूल प्रशासनातील तलाठी, ग्रामसेवकांनी मिशन मोडवर मोहिम आखावी. जिल्ह्यातील एकही शेतकरी पिक विम्यापासून वंचित राहू नये, याची काळजी घेण्यात यावी. शेतकर्‍यांनी केवळ एक रुपया भरून तातडीने पिक विमा योजनेत सहभागी व्हावे. असे म्हटले. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कुटे यांनी विविध योजनांच्या सद्यःस्थितीची माहिती दिली. यावेळी पिक विमा योजनेची माहिती देणार्‍या घडीपत्रिका तसेच चित्ररथाचे अनावरण जिल्हाधिकारी शिनगारे यांच्या हस्ते झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -