घरठाणेकोरोना कालावधीत १७ वर्षीय मुलीचा उत्तरप्रदेश ते ठाणे रेल्वे प्रवास; रेखाचे बॉलिवूडचे...

कोरोना कालावधीत १७ वर्षीय मुलीचा उत्तरप्रदेश ते ठाणे रेल्वे प्रवास; रेखाचे बॉलिवूडचे स्वप्न स्वप्नच

Subscribe

ठाणे आरपीएफ पोलिसांनी फिल्मी स्टाईलने घेतले ताब्यात

प्रत्येकालाच बॉलिवूडमध्ये नाशिब आजमावावे असे वाटते, त्यातून देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो तरुण मुले-मुली मुंबईकडे धाव घेतात. त्यामध्ये काही जनांचे स्वप्न सत्यात उतरते. तर काहींचे मुंबईत दाखल होण्यापूर्वीच भंग होते. असेच एका उत्तरप्रदेशमधील रेखा नामक १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे स्वप्न मुंबईत दाखल होण्यापूर्वी भंग झाले आहे. रेखाच्या भावांनी दिलेल्या तक्रारीवरून तिला ठाण्यात ठाणे रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने एकप्रकारे फिल्मी स्टाईलने ताब्यात घेत,सुखरूप कुटुंबियांकडे सुपूर्द केले. रेखा हिने आपल्या घरातून अभिनय आणि गायिका होण्यासाठी प्रोत्साहन मिळत नसल्याचे हे पाऊल उचलले खरे पण मुंबईला जात असल्याची कल्पना चिठ्ठी लिहून कुटुंबियांना दिली होती.एकीकडे कोरोना कहर सर्वत्र सुरू आहे. त्यातच, बॉलिवूड मध्ये संधी मिळेल या आशेने उत्तर प्रदेशातील बलिया येथे राहणारी रेखा (नाव बदलेले आहे ) या सतरा वर्षीय मुलीने मुंबईची वाट पकडली.

अभिनय आणि गायनाची आवड असताना घरातून तिच्या कलागुणांना हवातसा पाठींबा मिळत नव्हता.त्यातच आपले नशीब येथे राहून बदलणार नाही त्यासाठी मुंबईशी पर्याय नाही. म्हणून मुंबईत जाण्याचा निश्चित तिने मनाशी केला आणि तिने १५ मे रोजी कुटुंबियांना आपण मुंबईकडे जात असल्याची माहिती देणारी चिठ्ठी लिहून घरातून निघाली. मुंबईकडे येण्यासाठी महू रेल्वे स्थानकात छप्परा एक्सप्रेस बसली. एक्सप्रेस मुंबईकडे रवाना ही झाली. आता आपले स्वप्न पूर्ण होणार म्हणून आंनदी होती. याचदरम्यान ती घरातून अचानक न सांगताच गायब झाल्याचे समजताच तिच्या भावाने लगेच सोशल मीडिया, पोलीस आणि रेल्वेच्या कंट्रोल रूमला ती पळून गेल्याबद्दल माहिती दिली. त्यानुसार सर्वत्र तिचा शोध सुरू होता.महू रेल्वे स्थानकातून मुंबईकडे निघालेल्या गाड्यांमध्ये तिचा शोध सुरू असताना, ही माहिती ठाणे रेल्वे पोलिसांच्या ही कानावर आली.

- Advertisement -

तात्काळ ठाणे आरपीएफचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पी.बी.सिह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक नवीन सिंह, महिला उपनिरीक्षक सोनाली मलैया एवं महिला आ. रोशनी साहू यांच्या पथकाने ठाणे स्थानकात येणाऱ्या गाड्यांची कसून तपासणी सुरू केली. त्यातच रविवारी दुपारी २ च्या सुमारास ०१०६० या छप्परा एक्स्प्रेस ठाणे रेल्वे स्थानकात धडकली. त्यामध्ये तपासणी करताना महिलांच्या डब्यात एक मुलगी शांत आणि एकटीच बसली होती. रेखा हिचा फोटो आणि अंगावरील कपडे याची माहिती आरपीएफच्या पथकाकडे होती. त्यामुळे त्या मुलीचे साधर्म्य सारख दिसून आले. तिची चौकशी केली असता तिने घरातून पळून असल्याची कबूली दिल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर तिला खातजमा करत कुटुंबियांच्या स्वाधीन केलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -