घरठाणेडोंबिवलीत पोहण्यासाठी गेलेल्या 2 मुलांचा मृत्यू; चौघांना वाचविण्यात यश

डोंबिवलीत पोहण्यासाठी गेलेल्या 2 मुलांचा मृत्यू; चौघांना वाचविण्यात यश

Subscribe

डोंबिवली – डोंबिवलीजवळच्या भोपर गावातील गावदेवी मंदिरामागील खदानीत पोहण्यासाठी गेलेल्या 6 जणांपैकी दोघा अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली. त्यापैकी 4 जणांना वाचविण्यात यश आले आहे.

आयरे गावातील 6 मित्र भोपरच्या खदानीत दुपारच्या वेळी पोहायला गेले होते. दरम्यान, खदानीच्या खोलीचा अंदाज न आल्याने ती मुले एकामागोमाग एक बुडायला लागली. त्यांचा आरडाओरडा ऐकून गावकरी धावून आले. पोलीस व अग्निशमन दलाच्या जवानांना बोलावण्यात आले. त्यामुळे 4 जणांना वाचवण्यात यश आले असले तरी 2 मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यापैकी एकाचे नाव आयुष मोहन गुप्ता (१४) व दुसर्‍याचे अंकुश मिलिंद केदारे (१३) असे आहे.

- Advertisement -

याच खदानीमध्ये 5 महिन्यांपूर्वी ७ मे रोजी कपडे धुण्यासाठी गायकवाड कुटुंबातील 2 महिला व 3 मुले गेली होती. दुपारच्याच वेळी या एकाच कुटुंबातील 5 जणांचा खदानीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला होता, मात्र रविवारी पोहायला गेलेल्या मित्रांचा बुडतानाचा आवाज ऐकून गावकर्‍यांनी खदानीजवळ धाव घेत यातील 4 मुलांचा जीव वाचवला. वारंवार घडणार्‍या घटना लक्षात घेता प्रशासनाने काही काळ या खदानीजवळ सुरक्षा रक्षक ठेवले होते. तसेच खदानीबाहेर या धोकादायक खदानीत पोहण्यास बंदी असल्याचे फलक लावण्यात आले, मात्र तरीही दुर्घटना थांबत नसल्याने आता ही धोकादायक खदान बुजविण्यात यावी, अशी मागणी गावकरी करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -