घरमहाराष्ट्रनाशिकनाशिक बस दुर्घटनेतील ट्रकचालकाला अटक, ९ मृत प्रवाशांची ओळखी पटली

नाशिक बस दुर्घटनेतील ट्रकचालकाला अटक, ९ मृत प्रवाशांची ओळखी पटली

Subscribe

नाशिक – औरंगाबाद रोडवरील मिरची हॉटेल चौकात शनिवारी पहाटे झालेल्या बस व मालवाहू ट्रक अपघातातील एकूण ९ मृत प्रवाशांची ओळख पटवण्यात नाशिक शहर पोलिसांना यश आले आहे. उर्वरित प्रवाशांची डीएनए टेस्टच्या माध्यमातून ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. शिवाय अपघातानंतर फरार ट्रकचालकास आडगाव पोलिसांनी रविवारी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. रामजी उर्फ लवकुश जगधीर यादव (२७, रा. तारागाव, ता. हांडिया, उत्तर प्रदेश) असे ट्रकचालकाचे नाव आहे.

औरंगाबाद रोडवर ट्रक व बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात बसचालक ब्रह्मदत्त सोगाजी मनावर (रा. वसंतनगर, पोहरादेवी, ता. मानोरा, जि. वाशिम) याचा जागीच मृत्यू झाला, तर ट्रकचालक अपघातानंतर फरार झाला होता. नाशिक शहर पोलिसांनी मृत प्रवाशांची ओळख पटविण्यासाठी वारसांचा शोध सुरू केला होता. त्यामुळे रविवारी दिवसभरात पोलिसांना ९ मृतदेहांची ओळख पटवण्यात यश आले. पोलिसांनी मृतदेह वारसांच्या ताब्यात दिले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -