घरक्राइमचोरीस गेलेले 37 मोबाईल हस्तगत

चोरीस गेलेले 37 मोबाईल हस्तगत

Subscribe

मानपाडा पोलिसांकडून मालकांच्या ताब्यात

डोंबिवली । डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या दहा महिन्याच्या कालावधीत चोरीला गेलेले, पादचार्‍यांकडून लुटलेले 4 लाख 14 हजार रुपये किमतीचे 37 मोबाईल मानपाडा पोलिसांच्या विशेष तपास पथकाने हस्तगत केले आहेत. हे मोबाईल महाराष्ट्रासह उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, तमीळनाडू, कर्नाटक, बिहार राज्यांमधून हस्तगत करण्यात आल्याची माहिती डोंबिवली विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांनी दिली.

गेल्या दहा महिन्याच्या कालावधीत मानपाडा पोलीस ठाणे हद्दीतून अनेक प्रवासी, पादचारी, व्यावसायिक यांचे मोबाईल चोरीला गेले होते. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल होत्या . दर महिन्याला सात ते आठ घटना मोबाईल चोरीच्या होत असल्याने मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी सांगितले .गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश वणवे, सुनील तारमळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक तयार करण्यात आले होते.

- Advertisement -

मोबाईल चोरणारे चोरटे मोबाईल चोरी नंतर पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी परराज्यात पळून जातात. तेथे ते कमी किमतीला चोरीचे मोबाईल विकून तेथून फरार होतात .पोलीस पथकाने तांत्रिक माहितीच्या मदतीने चोरीला गेलेले 37 मोबाईल हस्तगत केले . एवढ्या मोठ्या संख्येने मोबाईल हस्तगत करण्याची कल्याण, डोंबिवलीतील ही पहिलीची महत्वाची घटना आहे. पोलिसांनी हस्तगत केलेले मोबाईल संबंधित नागरिकांना पोलीस ठाण्यात बोलावून परत देण्यात आले. मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -