घरthaneकल्याण-अंबरनाथ मुख्य रस्त्यावर 554 कोटींच्या उड्डाणपुलाचा प्रस्ताव

कल्याण-अंबरनाथ मुख्य रस्त्यावर 554 कोटींच्या उड्डाणपुलाचा प्रस्ताव

Subscribe

उल्हासनगर शहरातून जाणार्‍या कल्याण-अंबरनाथ राजमार्गांवर उड्डाणपुलाच प्रस्ताव महापालिकेने राज्य सरकारकडे सुपूर्द केला आहे. या उड्डाणपुलामुळे शहराची वाहतूक व्यवस्था सुरळीत होईल असे संकेत पालिका प्रशासनाने दिले आहे. या554 कोटींच्या उड्डाणपुलाचा अहवाल महापालिकेने मागच्या महिन्यात एमएमआरडीएला पाठवण्यात आला असल्याची माहिती शहर अभियंता संदीप जाधव यांनी दिली. उल्हासनगरातील कल्याण-अंबरनाथ राजमार्गासह शहरातील अन्य रस्त्यावर दिवसेंदिवस वाहतूक कोंडीची समस्या वाढत असल्याने शहरातील नागरिक त्रस्त आहेत. कल्याण-अंबरनाथ राजमार्ग हा रस्ता रस्ता शंभर फूट असताना या रस्त्यावर उल्हासनगर अंबरनाथ-बदलापूर या शहरातून येणार्‍या वाहनांच्या संख्येत कमालीची वाढ होत आहे. वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी एमएमआरडीएने या रस्त्यावर उड्डाणपूल बांधण्याचा (डीपीआर) प्रकल्पाचा अहवाल महापालिकेकडून मागविला होता.

त्यानुसार मनपा अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त अशोक नाईकवाडे आणि शहर अभियंता संदीप जाधव यांनी अथक परिश्रम घेऊन मागच्या महिन्यात 554 कोटी 51 लाखांचा सविस्तार अहवाल एमएमआरडीएला पाठविला आहे. एमएमआरडीएने उड्डाणपुलाच्या प्रकल्पच्या अहवालाला मान्यता दिल्यास, नवीन वर्षात उड्डाणपुलाच्या कामाला सुरू होणार असल्याचे संकेत शहर अभियंता जाधव यांनी दिले. शहरातील कल्याण ते अंबरनाथ मुख्य रस्त्यावर उड्डाणपूल झाल्यास, बाहेरून येणारी वाहने थेट उड्डाणपूलाद्वारे शहराबाहेर जाणार आहेत. त्यामुळे येथे वाहतूक कोंडी होणार नसल्याची माहिती देताना शहर अभियंता जाधव यांनी सांगितले, देशात सर्वाधिक दाटीचे शहर म्हणून उल्हासनगरची ओळख आहे. क्षेत्रफळाच्या प्रमाणात वाहनाची संख्या अधिक आहे. मात्र वाहनांच्या प्रमाणात रस्ते अरुंद असल्याने, वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. कल्याण अंबरनाथ मुख्य रस्त्यावर उड्डाणपूल तयार झाल्यास वाहतूक समस्या निकाली निघणार असल्याचा दावा मनपाने केला आहे. तसेच एमएमआरडीएने शहरातील एकूण सात मुख्य रस्त्यांचे निर्माण सुरू करण्याचा प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यासाठी 150 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मात्र हे रस्ते अद्याप सुरू झालेले नाही विशेष म्हणजे हे सर्व रस्ते मनपाच्या विकास आराखड्याप्रमाणे होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -