घरठाणे७०३ ग्राहकांवर वीजचोरीचे गुन्हे

७०३ ग्राहकांवर वीजचोरीचे गुन्हे

Subscribe

सुमारे ९० लाख रकमेची तब्बल पाच लाख युनिटची चोरी

फेब्रुवारी आणि मार्च या अवघ्या दोन महिन्यात वीज चोरी करणाऱ्या शहापूर तालुक्यातील ग्राहकांवर महावितरणने धडक कारवाई करीत ७० हून अधिक गावातील तब्बल ७०३ ग्राहकांवर वीजचोरीचे गुन्हे दाखल केले आहेत. महावितरणच्या भरारी पथकाने केलेल्या या कारवाईत ८८ लाख २५ हजार ८८५ रकमेची तब्बल चार लाख ८९ हजार ७४९ युनिट्सची वीज चोरी पकडण्यात आली आहे. शहापूर तालुक्यात फेब्रुवारी व मार्च २०२३ या दोन महिन्यात महावितरण तर्फे वीजचोरी पकडण्याची मोहीम राबविण्यात आली.

तालुक्यातील कसारा, सावरपाडा, लेनाड, वासिंद, सारंगपुरी, मुसईवाडी, कोठारे, साठगांव, मळेगाव शिलोत्तर, शेणवा, खर्डी, पिवळी, धसई, आटगाव, डोळखांब, कानविंदे, बिरवाडी, आसनगाव, शेरे, मुगाव, सारमाळ, शेई, लाहे, अंदाड, वाशाळा आदी ७७ गावांमध्ये राबविण्यात आलेल्या मोहिमेत तब्बल ७०३ ग्राहकांनी वीजचोरी केल्याचे आढळून आले. घरात इन्कमिंग वायरला जॉईंट असणे, मिटर बायपास, मिटरमध्ये छेडछाड करणे या प्रकारे चोरी करून या ग्राहकांनी तब्बल ८८ लाख २५ हजार ८८५ रकमेची चार लाख ८९ हजार ७४९ युनिट्सची वीज चोरी केली असल्याचे शहापुरच्या महावितरण कार्यालयाकडून सांगण्यात आले. शहापूरचे उपविभागीय अधिकारी अविनाश कटकवार यांच्या नेतृत्वाखाली सहायक अभियंता, कनिष्ठ अभियंता व कर्मचारी यांच्या भरारी पथकाने विज चोरावर धडक कारवाई केली असून वीजचोरी करणाऱ्या घरगुती, व्यावसायीक व औद्योगिक ग्राहकांना त्यांनी चोरी केलेल्या विजेचे देयक अदा करण्यात आले असल्याचे कटकवार यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -