घरठाणेलवकरच पालघर जिल्ह्यात नव्याने कारागृह उभारले जाणार

लवकरच पालघर जिल्ह्यात नव्याने कारागृह उभारले जाणार

Subscribe

मुंबई, ठाणे, कल्याण कारागृहात अपेक्षेपेक्षा जास्त कैदी

कल्याण । मुंबई, ठाणे आणि कल्याण कारागृहात तिप्पट संख्येने कैदी असल्याने या तीनही कारागृहातील कैदी संख्येचा ताण आटोक्यात आणण्यासाठी लवकरच पालघर जिल्ह्यात विस्तिर्ण जागेत नव्याने कारागृह उभारण्यात येणार असल्याची माहिती अपर पोलीस महासंचालक आणि कारागृह महानिरीक्षक, अमिताभ गुप्ता यांनी कल्याणात दिली. कारागृहातील कैद्यांना सिम कार्ड बेसिकवर फोन कॉलची सुविधा उपलब्ध करून दिली असून आठवड्यातून तीन वेळा कैद्यांना आपल्या कुटुंबियांशी बोलण्याची संधी मिळणार आहे. कल्याण जिल्हा कारागृह, आधारवाडी कारागृहात महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागामार्फत पुरविण्यात आलेल्या सिसी टीव्ही प्रकल्प, कॉइन बॉक्स सुविधा, ई मुलाखत युनिट, ई ग्रंथालय आदी सुविधांचा लोकार्पण सोहळा अमिताभ गुप्ता अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधार सेवा महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमाला योगेश देसाई कारागृह उपमहानिरीक्षक दक्षिण विभाग भायखळा,राजाराम भोसले अधीक्षक कल्याण जिल्हा कारागृह आदी मान्यवर उपस्थितीत होते.

यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी सांगितले की मूलभूत मानवी हक्क अधिकाराच्या द़ृष्टीकोनातून कैद्यांना महत्त्वाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पावले उचलली आहेत. या मध्ये ई मुलाखत, व्हिडिओ कॉन्फरन्सींग सुविधा देण्यासाठी सेंटर उभे केले आहे.या ठिकाणी व्हीसी,त्याच्या ट्रायल, कुटुंबासह लांब बाहेरगावी राहणार्‍या कैद्यांसाठी ई मुलाखत केंद्राचा उपयोग होणार आहे. त्याशिवाय पहिल्या असलेल्या लायब्ररीचे अत्याधुनिकरण करण्यात आले असून त्याचे रूपांतर ई लायब्ररीत रूपांतर करून लायब्ररी अपटूडेट केली आहे.
संपूर्ण परिसर सुरक्षेच्या दुष्टीकोनातून सीसी टिव्हीने कव्हर केला असल्याने आता प्रत्येक गोष्ट रेकॉर्ड होणार असल्याने रेकॉर्ड प्रमाणे सुरक्षा यंत्रणा नियंत्रणात येणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सींग द्वारे कैद्यांना महिन्यातून एक वेळा कुटुंबाबरोबर तर एक वेळा वकीलाशी संपर्क साधता येणार असल्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. अपडेट, मॉर्डन प्रिझन, सिक्युरिटी, मानवी अधिकार्‍याच्या दृष्टीने परिपूर्ण सुविधा महाराष्ट्रातील सर्वच कारागृहात उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -