घरक्राइमCrime : पुणे ISIS प्रकरणात मोठी अपडेट; टेरर फंडिंगसाठी दहशतवाद्यांचा सोन्याच्या दुकानावर...

Crime : पुणे ISIS प्रकरणात मोठी अपडेट; टेरर फंडिंगसाठी दहशतवाद्यांचा सोन्याच्या दुकानावर डल्ला

Subscribe

पुणे : मागील वर्षी कोथरूड पोलिसांनी दुचाकी चोरी करताना तिघांना पकडले होते. चौकशीत तिघेही दहशतवादी असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. त्यानंतर या तिन्ही दहशतवाद्यांना पुणे पोलिसांनी एटीएसकडे आणि नंतर एनआयएकडे सोपविले होते. यानंतर आता तिन्ही दहशतवाद्यांनी सोन्याच्या दुकानातून लाखो रुपयांचे दागिने आणि रोकड लंपास करून रक्कम टेरर फंडिंगसाठी वापरल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Big update on Pune ISIS case Terrorists raided gold shops for terror funding)

हेही वाचा – Politics : लोकसभा निवडणुकीपासून भाजपाच्या ‘या’ मंत्र्याने काढला पळ; मला यातून वाचवा, मुख्यमंत्र्यांना घातली गळ

- Advertisement -

दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) तपासात ही माहिती समोर आली असून याप्रकरणी एटीएसने नवीन गुन्हा दाखल केला आहे. तसेच तिन्ही दहशतवाद्यांना विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांनी दि. 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मोहम्मद शहानवाज आलम शफीउजमा खान उर्फ अब्दुल्ला उर्फ इब्राहीम (31, रा. झारखंड), मोहम्मद युनुस मोहम्मद याकुब साकी उर्फ छोटु (27, रा. मध्यप्रदेश रतलाम) आणि जुल्फिकार अली बरोडावाला उर्फ लाला उर्फ लालाभाई (44, रा. भिवंडी, ठाणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

चोरीच्या पैशांतून बॉम्ब बनविण्याचे साहित्य खरेदी

एटीएसने सांगितले की, दोन दहशतवाद्यांनी साताऱ्यातील एक सोन्याचं दुकानं लुटलं. त्यांनी या दुकानातून लाखो रुपये किमतीचे दागीने आणि रोकड लंपास केली. दहशतवाद्यांनी हे सोन्याचं दुकान टेरर फंडिंगसाठी लुटल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी विशेष सरकारी वकील विजय फरगडे यांनी आरोपींना पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. न्यायालयाने तिघांनाही 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – 

Lok Sabha 2024 : दुसरी यादी जाहीर करून भाजपाचा धक्का, ठाकरे गटाचा एक मोहरा टिपलासाडीच्या दुकानातून चोरी

दरम्यान, सातारा येथील अंजिठा चौकात गणपती सिल्क साडीचे दुकान आहे. संबंधित व्यापारी दुकान बंद करत असताना गेल्या वर्षी (8 एप्रिल 2023) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास अचानक दोघे पिस्तुलासह दुकानात शिरले. एकाने पिस्तुलाचा धाक दाखवला तर दुसर्‍याने तीन दिवसांची जमा झालेली एक लाखांची रोकड चोरी केली. त्यानंतर दोघेही दुचाकीवरून पळून गेले होते. याप्रकरणी संबंधित व्यापाऱ्याने सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -