घरठाणेसॅनिटरी पॅडच्याआड दारुची तस्करी

सॅनिटरी पॅडच्याआड दारुची तस्करी

Subscribe

राज्य उत्पादन शुल्क कल्याण विभागाच्या टीमने दोघांना ठोकल्या बेड्या, ४८००० हजार बनावट देशी दारूच्या बाटल्या केल्या जप्त

कल्याण : सॅनिटरी पॅडच्या आडून बनावट देशी दारूची तस्करी करणाऱ्या दोन आरोपीना राज्य उत्पादन शुल्क कल्याण विभागाच्या टीमने कल्याण पश्चिमेतील बाईचा पुतळा चौक परिसरात सापळा रचून  दोन आरोपींना  बेड्या ठोकल्या. साईनाथ नागेश रामगिरवार आणि अमरदिप शांताराम फुलझेले असे अटक आरोपींची नावे असून, या दोघांना न्यायालयात हजर केले असता 13 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार टेम्पोतून सॅनिटरी पॅड ग्राहकाला वितरित केले जात असल्याचे दाखवत प्रत्यक्षात सॅनीटरी पॅडच्या आड देशी दारूच्या बाटल्या लपवून  हे आरोपी तस्करी करत उल्हासनगर, अंबरनाथ परिसरात विक्रीसाठी आणत होते. याची माहिती राज्य उत्पादन शुल्क कल्याण विभागाला मिळाली. त्यांनी सापळा रचून या दोघांना ताब्यात घेत,  ४८०० हजार बाटल्या व एक आयशर ट्रक असा एकूण  ४३ लाख १४००० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या दोघांना १३ तारखे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. हा माल कुठून व कोणाला विकणार होते. याचा तपास पोलीस करीत आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -