घरठाणेमहिला गुंडाकडून हल्ले करणारे हे नपुंसकच- उद्धव ठाकरे

महिला गुंडाकडून हल्ले करणारे हे नपुंसकच- उद्धव ठाकरे

Subscribe

ही गुंडगिरी ठाण्यातून नाहीतर राज्यात उपटूनपटू टाकू असा इशारा

ठाण्याची ओळख शिवसेनेचे ठाणे, जीवाला जीव देणारे, महिलांचे रक्षण करणारे, धर्मवीर आनंद दिघे यांचे ठाणे आणि सुशिक्षित, सुसंस्कृत ठाणे अशी ओळख आहे. तीच ओळख पुसून गुंडांचे ठाणे असे करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. असा आरोप उध्दव ठाकरे यांनी ठाण्यात करत, ठाण्यात महिलांची गँग बनायला लागली आहे. महिला गुंडगिरी करायला लागल्या आहेत. त्यांच्याकडून हल्ले करणारे हे नपुसक म्हणावे लागले. असे टीकाटिप्पणी करताना, शिवसैनिक शांत राहिले याचा अर्थ तुमच्यासारखे जे सर्वोच्च न्यायालय म्हणते त्याप्रमाणे शिवसैनिक नपुसक नाही आहेत, जर मनात आणले तर तुम्हाला ठाण्यातून मुळा सकट उपटून टाकण्याचे हिंमत जिद्द दाखवणारे शिवसैनिक आणि ठाणे नागरिक आज देखील ठाण्यात आहेत, असा इशारा ठाकरे यांनी यावेळी दिला.

याचदरम्यान त्यांनी उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीका करताना, जर एका महिलेला मारहाण केली जाते आणि राज्याचे गृहमंत्री काही करत नसतील केवळ लालघोटेपणा करत असतील तर त्यांना गृहमंत्रीपदावर राहण्याचा अधिकार नाही, त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. असे म्हटले. याचबरोबर तक्रार घेण्यासाठी पोलीस आयुक्तच कार्यालयात नसतील तर त्यांच्यावर देखील निलंबनाची कारवाई करावी असे मागणी यावेळी त्यांनी बोलताना केली.
सोमवारी रात्री घोडबंदर रोड येथे टिटवाळा येथील उध्दव ठाकरे शिवसेना गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांना मारहाण करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांच्यावर चरई येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मंगळवारी दुपारी उद्धव ठाकरे हे त्या महिलेच्या प्रकृतीची विचारपुस करण्यासाठी ठाण्यात आले होते. त्या महिलेची विचारपूस करून ते तक्रार करण्यासाठी पोलीस आयुक्तांकडे गेले होते. मात्र पोलीस आयुक्तच कार्यालयात नसल्याचे दिसून आले.
याचदरम्यान ठाणे शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांवर निशाणा साधला. पुढे बोलताना हे गुंडगिरीचे राज्य आहे. यांना मुख्यमंत्री म्हणायचं का गुंडमंत्री म्हणायचे हे लोक ठरवतील. त्यांनी जाहीर करावे. असे म्हणताना, त्यांनी मंत्रीमंडळाच्या विस्तारात एक नवे खाते निर्माण करावे. ते गुंडमंत्री असे पद निर्माण करून गुंड पोसण्याचे काम त्या मंत्र्याकडे द्यावे असा खोचक सल्लाही उद्धव ठाकरे यांनी सरकारला दिला.

- Advertisement -

उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना, ठाकरे यांनी त्यांना राज्याला फडतूस गृहमंत्री लाभलाय,असा उल्लेख केला. अत्यंत लाचार, लाळघोटेपणा करणारा, उपमुख्यमंत्रीपद मिळाले. म्हणून नुसती फडणविसी करणारा एक माणूस गृहमंत्री म्हणून मिरवतोय. असे म्हटले. पण त्यांच्याच कार्यकर्त्यांवर मिंधे गटाच्या आमदारानी हल्ला केला, तरी कुठे काही हलायला तयार नाही, असेही ठाकरे यांनी यावेळी सांगितले. यांची गुंडगिरी वाढायला लागली आहे. ठाण्यात एका पत्रकाराला धमकी देण्यात आली. महिलांना मारहाण केली जातेय. त्या महिलेला आम्ही भेटलो. त्या म्हणतायत की त्यांनी अशी कोणतीही कमेंट केली नाही. त्यांच्याकडून माफी मागण्याचा व्हिडीओ करून घेण्यात आला. तोही त्यांनी दिला. तरी आणखीन महिलांना बोलवून मारहाण करण्यात आली. असे सांगताना मला वाटते फडतूस गृहमंत्र्यांना पदावर राहाण्याचा कोणताच अधिकार नाही, अशा शब्दांत त्यांनी फडणवीसांवर टीका केली. दरम्यान फडणवीसांच्या घरावर काही आले तर लगेच एसआयटी नेमली जाते. बाजूच्या राज्यात जाऊन अटक केल्या जातात. त्यांच्या पक्षातल्या लोकांवर मिंधे गटाकडून हल्ले झाले, तर तिथे ही फडणवीसी दाखवण्याची त्यांची हिंमत नसल्याचे म्हटले आहे. तसेच पुढे बोलताना ज्यांच्या नावाने यात्रा काढतात, त्यांचे विचार जर रक्तात नसतील फुकाच्या यात्रा काढू नका, आमचे सरकार आल्यानंतर या सगळ्यांना जलयात्रा करावीच लागेल असा इशाराही त्यांनी दिला

उद्धव ठाकरे यांनी घेतली त्या महिलेची भेट
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांची पत्नी रश्मी ठाकरे या दाम्पत्यासह माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी ठाण्यात येऊन सोमवारी मारहाण झालेल्या रोशनी शिंदे या महिलेची खासगी रुग्णालयात जाऊन भेट घेतली. तसेच त्या महिलेची विचारफुस केली. याप्रसंगी खासदार राजन विचारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आदी उपस्थित होते. त्यानंतर उध्दव ठाकरे यांनी आपला मोर्चा शहर पोलीस आयुक्तालयाकडे वळवला. त्यावेळी, पोलीस आयुक्त जय जित सिंग हे कार्यालयात नसल्याने तक्रारी निवेदन न देता ठाकरे यांना माघारी परतावे लागले. याचदरम्यान यावेळी शिवसैनिकांची गर्दी पाहण्यास मिळाली असून पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला होता.

- Advertisement -

ठाण्यात आज शिवसेनेचा महामोर्चा
रोशनी शिंदे हिच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मंगळवारी पहाटे पाच वाजेपर्यंत नाहीतर आतापर्यंत तक्रार घेतलेली नाही. तक्रार न घेणाऱ्या पोलिसांच्याविरोधात निष्क्रिय पोलीस आयुक्तांच्या विरोधात बुधवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास ठाण्यातील छत्रपती शिवाजी मैदान येथुन ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यालयावर शिवसैनिक व महिला आघाडीच्या वतीने महामोर्चा काढण्यात येणार आहे. यावेळी टाळे नेत त्या कार्यालयाला टाळे ठोकण्यात येणार आहे. या महामोर्चाचे नेतृत्व शिवसेना नेते आदित्य ठाकरे करणार असून यावेळी महाविकास आघाडीचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांनी बोलताना दिली.

ती महिला गरोदर नसल्याचा डॉक्टराचा दावा
ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल असलेल्या रोशनी शिंदे ही महिला गरोदर नसल्याचे केलेल्या दोन केलेल्या तपासणीनंतर अहवालात समोर आले. अशी माहिती त्या महिलेवर उपचार करणारे डॉ उमेश आळेगावकर यांनी पत्रकार परिषदेत देत, दावा केला आहे. यावेळी त्यांनी त्या महिलेची प्रकृती स्थिर असून तिला मुका मारला आहे. सद्यस्थितीत ती महिला केवळ वैद्यकीय निगराणी खाली रुग्णालयातील आयसीयूमध्ये असल्याचेही डॉ आळेगावकर यांनी सांगितले.

त्या लेखी तक्रारीत दोन माजी नगरसेवकांची नावे
रोशनी शिंदे यांनी मारहाण झाल्यानंतर कासारवडवली पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या नावे केलेल्या लेखी तक्रारीत त्यांच्यावर जीवघेणा हल्ला असल्याचे म्हटले आहे. यामध्ये त्यांनी नम्रता भोसले आणि सिद्धार्थ ओवळेकर या दोन माजी नगरसेवकांसह २० जणांनी ऑफिसमध्ये घुसून शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप केला आहे. तसेच यापूर्वीच भांडण वाढू नये, म्हणून सॉरीही म्हटल्याचे ही नमूद केले आहे.

फडणवसींची काडतुसे घुसल्यानेच रस्त्यावर येण्याची आली उध्दव ठाकरे यांच्यावर वेळ- म्हस्के
राज्याच्या गृहमंत्र्यांना फडतूस बोलणे ही भाषा उध्दव ठाकरे यांच्या तोंडी शोभत नाही. तुम्ही जर आमच्या नेत्यांना अशा भाषेत बोलत असाल तर तुम्हाला याच फडणवीसांची काडतुसे तुमच्या घुसल्याने तुम्हाला रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. असा टोला शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी लगावला. त्यामुळे उगाच टिका करु नका, नाही तर ही काडतुसे आणखी कुठे कुठे घुसतील हे समजणार देखील नाही, असा इशाराही त्यांनी दिला. पुढे बोलताना मुख्यमंत्री हे कोणत्या निकषात तुम्हाला गुंड दिसत आहेत, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राज्यातील जनतेची सेवा करीत असल्याचे त्यांनी सांगितले. वारंवार तुम्ही सांगता आम्ही मर्द आहोत, मग महिलेचा आधार कशाला घेता असा सवालही त्यांनी उपस्थित केला. पोलीस आयुक्तांना भेटायलाच जायचे होते, तर त्यांची आधी वेळ घेऊन भेटायला जायचे होते असा सल्लाही त्यांनी दिली. तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री होतात,

खासदारांनी हिम्मत असेल समोर येऊ लढवावे
खासदार राजन विचारे हे कधी कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत, आता तर त्यांनी महिलेचा आधार घेतला आहे. तुमच्या हिम्मत असेल तर आमच्या समोर येऊन लढून दाखवा असे आव्हान नरेश म्हस्के यांनी दिले. तर त्या महिलेला कोणत्याही प्रकारची मारहाण झालेली नसून तीची प्रकृत्ती उत्तम असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे जे काही आरोप केले जात आहेत, ते चुकीचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

धक्काबुक्की झाली, मारहाण नाही- मिनाक्षी शिंदे
सीसीटीव्ही फुटेज पाहिलं तर त्यात मारहाण झाल्याचे दिसत नाही. तिला समजवायला गेल्यानंतर ती उलटसुलट उत्तरं द्यायला लागली. तेव्हा थोडी धक्काबुक्की झाली. पण नंतर तिला पुन्हा वर घेऊन गेले. तिला कोणीही मारले नाही. असे खोटे आरोप करणाऱ्यांवरही मग कारवाई करावी लागेल, असा दावाही शिंदे गटाच्या नेत्या मीनाक्षी शिंदे यांनी केला आहे.

“माझ्या पोटावर लाथा मारू नका म्हणून मी विनवणी केली. पण, तरीही माझ्या पोटावर मारण्यात आले. पोलीस ठाण्यात देखील मी दोन वेळा चक्कर येवून पडले. तरीसुद्धा कुणी लक्ष द्यायला तयार नव्हते. खासदारांनी जिल्हा सामान्य (सिव्हील) रुग्णालयात नेले. तिथेही उलट्या होत होत्या. पण कुणीही लक्ष देण्यास तयार नव्हते. दुखतेय सांगून देखील कुणी लक्ष देत नसल्यामुळे खासगी रुग्णालयात दाखल केले ”
– रोशनी शिंदे, मारहाण झालेली महिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -