घरठाणेयुती सरकारमुळे निर्बंधमुक्त महावीर जयंती साजरी करता येणे झाले शक्य

युती सरकारमुळे निर्बंधमुक्त महावीर जयंती साजरी करता येणे झाले शक्य

Subscribe

 महावीर जयंतीनिमित्त श्री ठाणे जैन महासंघाच्या रथयात्रेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवला झेंडा  जैन बांधवांना दिल्या महावीर जयंतीच्या शुभेच्छा

राज्यात युती सरकार सत्तेत आल्यानंतर सर्वच सणावरील निर्बंध हटले असून त्यामुळेच आज महावीर जयंतीनिमित्त निघणारी रथयात्रा देखील त्याच उत्साहात निघत असल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. तसेच समाजातील सर्व घटकांना न्याय देणारे हे सरकार असून यापुढेही सर्वसामान्याना न्याय देण्यासाठी ते कटिबद्ध असेल असेही यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. महावीर जयंतीनिमित्त मंगळवारी ठाण्यातील श्री ठाणा जैन महासंघाने आयोजित केलेल्या रथयात्रेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी झेंडा दाखवून या यात्रेचा शुभारंभ केला. तसेच यानिमित्ताने जैन मुनींचे त्यांनी शुभआशीर्वाद देखील घेतले, तसेच जैन बांधवांशी संवाद साधला.

यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी भगवान महावीरांचे विचार आचरणात आणून मार्गक्रमण करणारा जैन समाज हा अत्यंत शांतताप्रिय समाज आहे. या समाजाने क्षमाशील वृत्ती जोपासून मानवजातीच्या कल्याणासाठी कार्यरत राहण्याला प्राधान्य दिले आहे. आज भगवान महावीरांच्या जयंतीदिनी त्यांचे हेच विचार आपल्या सर्वांना प्रेरणादायी ठरावे आशा शुभेच्छा सर्वांना देत असल्याचे सांगितले. यावेळी आमदार प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे आणि श्री ठाणा जैन महासंघाचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -